Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईमधील ‘या’ मार्केटमध्ये मिळते गौरी गणपतीच्या सजावटीचे सुंदर सामान, डेकोरेशनच्या सामानासाठी उत्तम पर्याय

बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे मुंबईच्या मार्केटमध्ये सामान खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये मानाच्या आणि मोठ्या गणपतींच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली असून मुंबईमध्ये एक वेळच उत्साह निर्माण झाला आहे. गणपती बाप्पाच्या येण्याची चाहूल लागल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साह असतो. गणपती बाप्पा सोबत गौरीचे सुद्धा आगमन होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 01, 2024 | 02:44 PM
सजावटीच्या सामान खरेदीसाठी मुंबईमधील 'या' मार्केटना नक्की भेट द्या

सजावटीच्या सामान खरेदीसाठी मुंबईमधील 'या' मार्केटना नक्की भेट द्या

Follow Us
Close
Follow Us:

ऑगस्ट महिना संपल्यानंतर गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. संपूर्ण मुंबई, पुणे, कोकणसह इतर राज्यांमध्ये बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे मुंबईच्या मार्केटमध्ये सामान खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये मानाच्या आणि मोठ्या गणपतींच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली असून मुंबईमध्ये एक वेळच उत्साह निर्माण झाला आहे. गणपती बाप्पाच्या येण्याची चाहूल लागल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साह असतो. गणपती बाप्पा सोबत गौरीचे सुद्धा आगमन होते.

गणपती आणि गौरीच्या आगमन सोहळ्यासाठी सगळीकडे जोरदार तयारी केली आहे. मुंबईच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. बाजारात सजावटीचे वेगवेगळे साहित्य उपलब्ध झाल्याने नागरिक दुकानांमध्ये मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना शेवट्याच्या टप्प्यातील सामान खरेदी नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गणपती बाप्पाच्या खरेदीसाठी मुंबईमधील कोणती मार्केट प्रसिद्ध आहेत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

हे देखील वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीला गणपती बसवणार आहात; तर ‘या’ नियमांचे अवश्य पालन करा

सजावटीच्या सामान खरेदीसाठी मुंबईमधील ‘या’ मार्केटना नक्की भेट द्या:

कीर्तीकर मार्केट:

गणपती बाप्पाच्या खरेदीसाठी मुंबईमधील कीर्तीकर मार्केट सगळीकडे प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये सजावटीच्या सामानापासून ते गणपती बाप्पाच्या हार आणि फुलांपर्यंतचे सगळे साहित्य मिळते. १०० रुपयांपासून ते अगदी पाच हजार रुपये किंमतीच्या वस्तू सुद्धा या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे मार्केट दादर स्थाकानावरून अगदी जवळ असल्यामुळे तुम्ही इथे कधीही जाऊ शकता. गणपती बाप्पा आणि गौराईच्या डेकोरेशनचे सर्व साहित्य कीर्तिकर मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

क्रॉफर्ड मार्केट:

मुंबईमधील सगळ्यात जुने आणि सर्व प्रकारच्या वस्तू मिळणारे क्रॉफर्ड मार्केट तुम्हाला माहीतच असेल. मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या मार्केटबद्दल एक वेगळेच आकर्षण आहे. या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात. वर्षाच्या बाराही महिने सुरु असलेले मार्केट फिरण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या राज्यांमधून येत असतात. क्रॉफर्ड मार्केटमध्ये महिलांच्या दागिन्यांपासून तते सजावटीच्या सामानापर्यंत प्रत्येक साहित्य या मार्केटमध्ये मिळते.

सजावटीच्या सामान खरेदीसाठी मुंबईमधील ‘या’ मार्केटना नक्की भेट द्या

रानडे रोड मार्केट:

दादरच्या रानडे रोडवर असलेले मार्केट फिरण्यासाठी रोज मोठी गर्दी असते. सणासुदीच्या दिवसांमध्ये इथे लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. दादर स्थानकात उतरून बाहेर आल्यानंतर या मार्केटची सुरुवात होते. रानडे रोड मार्केटमध्ये पूजेच्या फुलांपासून कपडे, दागिने, सजावटीचे साहित्य इत्यादी अनेक वस्तू मिळतात. या सर्व वस्तू कमीत कमी साहित्यामध्ये चांगल्या दर्जाच्या मिळत असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी असते.

हे देखील वाचा: गणेशोत्सवात गणपती बाप्पाची कोणत्या रंगाची मूर्ती घरी आणावी? जाणून घ्या

विलेपार्ले मार्केट:

विलेपार्ले मार्केटमध्ये सजावटीचे साहित्य चांगल्या आणि स्वस्त दरात मिळते. विलेपार्ले स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर या मार्केटची सुरुवात होते. छोट्याशा जागेत असलेले हे मार्केट फिरण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. रेडी थीम डेकोरेशन, फुलांचे साहित्य इत्यादी अनेक गोष्टी या मार्केटमध्ये उपलब्ध असल्यामुळे तुम्हीसुद्धा विलेपार्ले मार्केटला नक्की भेट देऊ शकता.

Web Title: Ganesh chaturthi 2024 best gauri ganpati decoration market in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 02:44 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी
1

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक
2

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा
3

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून
4

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.