Ganesh Chaturthi 2025 Ganesh festival stories in Marathi
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी केवळ चार उरले आहेत. सर्वत्र बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु आहे. घरामध्ये बप्पासाठी खास डोकेरेशन तयार केले जात आहेत. खास असे चविष्ट मोदक प्रसादासाठी तयार केले जात आहे. शिवाय अनेक मंडळांनी देखील बप्पाच्या स्वागताची जल्लोषात तयारी केली आहे. आज आपण यानिमित्त भगवान गणेशाची एक मनोरंजक कथा जाणून घेणार आहोत.
तुम्ही भगवान गणेशाच्या जन्माच्या, त्यांच्या लीलांच्या अनेक पुराण कथ ऐकल्या असतील. माता पार्वतीच्या उबटनापासून गणेजींचा जन्म झाला ते त्यांना हत्तीचे मस्तकाच्या रुप कसे मिळाले. अशा कथी तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. तसेच तुम्हाला हेही माहिती असेल की, प्रत्येक देवांमध्ये आणि मानवामध्ये श्री गजाननाला प्रथम स्थान दिले जाते. पण तुम्हाला माहित आहे का, पातळलोकमध्येही गणेश भगवंतांना पुजले जाते. याची कथी बुहेतक लोकांना माहितही असे किंवा नसलेही. पण ही कथा तुम्हाला माहित नसले तर हा लेख नक्की वाचा.
पौरानिक कथेनुसार, एकदा गणेश भगवान पराशर ऋषींच्या आश्रमात त्यांच्या पुत्रांसोबत खेळत होते. यावेळी तिथे नागलोकातील काही कन्या आल्या. या नागकन्यांनी भगवान गणेशला त्यांच्या पातळलोकात त्यांच्यासोबत जाण्यास आग्रह धरला. भगवान गणेशांनी होकार देताना नाग कन्या त्यांना घेऊन सर्पलोकात गेल्या. त्यांनी तिथे भगवान गणेशजींचे स्वागत केले. त्यांचा आदरातिथ्य केले.
यावेळी सर्पराजा वासुकीने भगवान गणेशाला पाहिले. भगवान गणेशजींची उपहासात्मक थट्टा केली. त्यांच्या रुपावरुन त्यांची खिल्ली उडवली. यामुळे भगवान गणेशाला खूप राग आला. त्यांनी नागराज वासुकीच्या फणीवर पाय ठेवला, त्यांचा मुकुटही परिधान केला. वासुकीची ही अवस्था त्याचा मोठा भाऊ शेषनागाला पाहावली नाही. शेषनागही तेथे आले. यावेळी शेषनाग खूप रागात होते.
त्यांनी रागात वासुकीसोबत कोणी उद्धटपणा केला असे विचारले. यावेळी भगवान गणेश त्यांच्यासमोर आले. पण भगवान गणेशजींना पाहताच नागशेषने त्यांचे अभिवादन केले. त्यांचे तेज पाहून शेषनाग यांनी भगवान गणेशांना सर्पलोकाचा म्हणजेच पातळलोकाचा राजा केला.
अशा पद्धतीने भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र भगवान गणेश देवलोक, पाताळलोक आणि मानवांमध्ये सर्वप्रथम पुजले जातात. आपणही कोणत्याही कामाची सुरुवात करताना श्री गणेशाय नमहा: ने करतो. तर अशी आहे ही मनोरंजक कथा. तुमच्या मुलांना आणि आसपासच्या लोकांना माहित नसेल तर नक्की.