Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोव्यातील गणेशोत्सव: परंपरा आणि एकतेचा मेळ संस्कृतीचं प्रतिबिंब

मुंबईचा गणेशोत्सव तर नेहमीच गाजतो. पण तुम्हाला माहीत आहे का? मुंबईप्रमाणेच पुणे, कोल्हापूर, गोवा यासारख्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. यावेळी आपण गोव्याची संस्कृती आणि गणेशोत्सवासाठी काय काय तयारी करण्यात येते आणि कशी संस्कृती जपण्यात येते हे जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 04, 2024 | 12:09 PM
गोव्याच्या गणपतीची संस्कृती

गोव्याच्या गणपतीची संस्कृती

Follow Us
Close
Follow Us:

ज्याची सर्वच गणेश भक्त आतुरतेने वाट पाहत असतात तो गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे तसतसा सगळीकडे उत्साह दिसून येत आहे. सुबक गणेशमूर्ती, रंगीबेरंगी मखर आणि पारंपारिक चतुर्थीच्या फराळाच्या विविध स्टॉल्सने बाजारपेठा गजबजल्या आहेत. 

गणेश चतुर्थी हा गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग असल्याने कुटुंबातील सदस्य यानिमित्ताने एकत्र भेटतात.  विविध सामाजिक घटक एकत्र येऊन गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. भारताच्या इतर भागांप्रमाणे, परंपरा आणि सामुदायिक मूल्यांमध्ये गोव्याचे सण- उत्सव खोलवर रुजलेले आहेत, जे राज्याच्या संस्कृतीची मूळं प्रतिबिंबित करतात. गोवा पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार तुम्हीही आमच्या नजरेतून गोव्याचा गणेशोत्सव पाहू शकता. (फोटो सौजन्य – गोवा पर्यटन विभाग) 

गणेश मूर्ती

मूर्तिकार गणपतीच्या उत्कृष्ट मूर्ती तयार करण्यात सध्या व्यस्त आहेत. चिकणमाती आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून या सुबक मूर्तीं घडवल्या जात आहेत. मूर्त्यांना हाताने रंगवले जाते. डोळे तर इतके आखीव रेखीव असतात की जणू त्यात मूर्तीकाराने प्राण ओतले असावे असाच भास होतो. 

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीला गणपती बसवणार आहात; तर ‘या’ नियमांचे अवश्य पालन करा

गणेशोत्सवाची तयारी सुरू

गोव्यातील गणपतीची तयारी

गोकुळाष्टमी संपली की गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. संपूर्ण कुटुंबच या तयारीच्या कामाला लागते. घराची साफ सफाई, रंगरंगोटी, रांगोळ्यांची आरास या सगळ्यांनी वातावरण भारून जाते. विविध सजावटीच्या वस्तू, मिठाई, फळे, रंगीबेरंगी फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. 

माटोळी  

कशी कराल माटोळी

गणेशोत्सवात गोव्यात माटोळी हा पारंपारिक सजावटीचा प्रकार पाहण्यास मिळतो. वेगवेगळ्या फळा-फुलांनी सजलेली ही माटोळी मखरात बसलेल्या बाप्पाच्या डोक्यावर सजवली जाते. माटोळी म्हणजे चौकोनी आकारात बनवलेली लाकडी चौकट. त्याचा आकार हा प्रत्येकाच्या सोयीनुसार ठरवला जातो. 

चतुर्थीच्या आदल्या दिवशी ही चौकट सजवायला जवळपासच्या रानातील विविध प्रकारची फळे फुले आणली जातात. मग ती आकर्षकरित्या चौकटीवर सजवून माटोळी तयार केली जाते व गणरायाच्या मखरावर सजावटीसाठी बांधली जाते. यामध्ये घागऱ्या, कांगळा, कुडेफळ, आटकी, धोत्रा, रुई अशी नानाविध जंगली वनस्पती, फळे, फुले बांधली जातात. औषधी गुणधर्म असलेल्या या वनस्पती, मनुष्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असतात. त्यामुळे चतुर्थीच्या काळात यांचा प्रभाव आपल्यावर व्हावा असा यामागचा उद्देश असतो. यासोबतच माटोळी मध्ये सुपारी, नारळ, काकडी, चिबुड, पेरू, सफरचंद केळी, चिटपाम हे जंगली फळ आदींचा देखील समावेश असतो. 

गणेशोत्सवातील मिठाई 

गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान गोवा लोक पारंपारिकपणे प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या विविध गोड आणि चवदार पदार्थांचा आस्वाद घेतात, ज्यात मोदक (भगवान गणेशाचे आवडते) नेवऱ्यांचा (करंजी)  समावेश असतो ज्या बेसनापासून बनवलेल्या गोड असतात. सोबत रवा, खोबरे, सुका मेवा आणि फळे असतात. त्याचप्रमाणे बेसन आणि रव्याचे लाडू, नारळ बर्फी, चकली, शंकरपाळी आणि चिवडा असा घरगुती फराळ देखील बनवला जातो. पारंपारिक उकडीचे मोदक, पंचखड्या आणि पुरणात बनवलेले मोदक सुद्धा असतात. सध्या चॉकलेट मोदक देखील मिळतात. 

पारंपारिक फुगडी आणि आरती

चतुर्थीच्या वेळी फुगडी, भजन, आरत्या यांसारखी पारंपारिक लोकनृत्ये सणांमध्ये चैतन्य आणतात. श्रीगणेशाच्या मूर्तीभोवती स्तोत्रे गाऊन आणि निरंजन वात फिरवून आरत्या केल्या जातात. तरुण पिढीही घुमट आरती करतात. दरम्यान, सर्व महिला एकत्र येऊन फुगड्या खेळतात. हास्यविनोद करत फुगड्या खेळल्या जातात. चतुर्थीच्या वेळी भजनेही केली जातात.

देखावा परंपरा

माशेल आणि कुंभारजुआमध्ये, ‘देखावा’ परंपरा महत्वाचे आकर्षण असते. संपूर्ण कुटुंब सर्वात आकर्षक सजावट तयार करण्यामध्ये गुंतलेले असतात. रस्त्यावर विजेची रोषणाई डोळे दिपवतात तर भक्तिमय गीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जाते. 

हेदेखील वाचा – गणपती बसविण्याचा मुहूर्त 2 दिवस, गणेश चतुर्थीच्या दिवशी कधी करावी गणेशाची प्रस्थापन, शुभ तारीख

सांगोड परंपरा

कुंभारजुआ गाव त्याच्या अनोख्या “सांगोड” परंपरेसाठी देखील ओळखले जाते. गणेश चतुर्थीच्या सातव्या दिवशी होणारी निघणारी गणेश विसर्जन मिरवणूक सजवलेल्या नांग्या आणि बोटीमधून काढली जाते. हे फ्लोट्स पौराणिक देखावे तसेच समकालीन सामाजिक संदेश दर्शवतात.

पुनर्संचयित आणि आध्यात्मिक पर्यटन

गोव्यातील पर्यटन

गोव्यातील गणेशोत्सव पुनर्संचयित आणि अध्यात्मिक पर्यटनाचे सार मूर्त रूप देते. हा सण नातेसंबंध आणि मैत्रीचे बंध दृढ करतो. गोव्यातील समुदाय मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतो.

एकतेचा उत्सव

गणेश चतुर्थी हा भक्ती, समुदाय आणि उत्सवाच्या भावनेला मूर्त रूप देणारा सण आहे. मोदकांचा मधुर सुगंध, भक्तीगीतांचा आवाज आणि सजावटीच्या आकर्षक रंगांनी रस्ते लवकरच भरून जातील. गणेश चतुर्थीच्या आनंदात तल्लीन होण्यासाठी सज्ज व्हा, हा उत्सव लोकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. 

Web Title: Ganesh chaturthi ganpati in goa a combination of tradition and unity is a reflection of culture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 12:09 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganeshotsav
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी
1

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक
2

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा
3

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून
4

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.