कमीत कमी साहित्यामध्ये केलेले घरगुती उपाय
गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तासशिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांना ओढ लागल्यामुळे संपूर्ण मुंबईनगरीमध्ये एक वेगळाच आनंद आहे. सण उत्सवात सर्वच महिलांना सुंदर नटायला आणि थाटायला आवडत. महिला सुंदर दिसण्यासाठी काहींना काही करत असतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये महिला इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यऐवजी सगळ्यात आधी पार्लरमध्ये जातात. पार्लरमध्ये महागड्या ट्रीटमेंट करून घेणे, फेशिअल करणे, स्क्रबिंग करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण इत्यादी सर्व उपाय केल्यानंतर सुद्धा त्वचा काही वेळासाठी सुंदर दिसते. पण काही दिवसांनंतर चेहऱ्यावर पुन्हा एकदा थकवा जाणवतो.
चेहऱ्यावर थकवा जाणवू लागल्यानंतर त्वचेचे सौदंर्य कमी होऊन जाते. गणपतीच्या दिवसांमध्ये सगळ्यांची खूप धावपळ होते. धावपळीच्या दिवसांमध्ये अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात. तसेच चेहऱ्याचे सौदंर्य हळूहळू कमी होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गणेशोत्सवात सुंदर चमकदार त्वचेसाठी साखरेचा वापर कसा करायचा याबद्दल सांगणार आहोत.कमीत कमी साहित्यामध्ये केलेले घरगुती उपाय त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहेत. चला तर जाणून.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ऍलोव्हेरा ज्यूस पिण्याचे शरीरासाठी फायदे; आरोग्यासाठी एक उत्तम पेय
लिंबूमध्ये असलेले विटामिन सी त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. लिंबू, साखर त्वचेवर उत्तम स्क्रबिंग एजंट्स आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी साखर आणि लिंबाचा वापर करावा. यासाठी एका वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात साखर मिक्स करा. मिश्रण तयार झाल्यानंतर चेहऱ्याला लावून 5 मिनिटं हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून घ्या. मसाज करून झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या त्वचेवरील काळी झालेली त्वचा निघून जाईल.
हे देखील वाचा: केसातील डँड्रफला दूर करण्यासाठी फायदेशीर; भेंडी खाण्याचे 5 फायदे
त्वचेसाठी टोमॅटोचा रस अतिशय गुणकारी आहे.स्क्रब बनवण्यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्यात टोमॅटोचा रस मिक्स करा. त्यानंतर जाडसर मिश्रण तयार करून संपूर्ण चेहऱ्याला लावा. चेहऱ्याला लावलेली पेस्ट 15 ते 20 मिनिटं ठेवून नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. टोमॅटोच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी मदत करतात.