
दिवसाची सुरुवात करा सकारात्मक आणि आनंदी विचारांनी! प्रियजन आणि नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
Good Morning Messages: सकाळी उठल्यानंतर कायमच सकारात्मक विचारांनी सुरुवात करणे फार आवश्यक आहे. यामुळे दिवस सुद्धा आनंदात जातो आणि मन सुद्धा प्रसन्न राहत. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवणे फार आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमध्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे नात्यांमधील संवाद हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे तुमच्या सोबत इतरांचा सुद्धा दिवस आनंद आणि उत्साह जाण्यासाठी शुभ सकाळचे हे मराठमोळे संदेश नातेवाईक आणि प्रियजनांना नक्कीच पाठवा. यामुळे नात्यांमधील प्रेम वाढण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो…
कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही…
ते आपोआप जोडलं जातं….
खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते….
हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो …!!
तुमचा दिवस सुखाचा जावो
शुभ प्रभात
दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मुर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात.
हे आपलं आपणच ठरवायचं आपल्याला डोकी फोडणारा दगड व्हायचंय की सर्वांना नतमस्तक करणारी मुर्ती……
तुमचा दिवस सुखाचा जावो
शुभ सकाळ
कडू गोळी चावली नाही गिळली जाते, तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसू नये, त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल…
तुमचा दिवस सुखाचा जावो
शुभ सकाळ
❝ अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो..
मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो.❞
शुभ सकाळ
स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,सकारात्मक विचार पुस्तक
“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”
शुभ प्रभात
नातं किती वर्षाचं आहे, त्यापेक्षा
तुमच्या त्यात किती भावना गुंतलेल्या आहेत हे जास्त महत्वाचं …
सुप्रभात
नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय.
” कायम शीतलता ठेवा !
शुभ सकाळ
!! तुमचा दिवस छान जाओ !!
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे,
दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा !
!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!
!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!!!
आयुष्यात नेहमी एक लक्षात ठेवा
स्वता केलेली चूक
स्वतःला कबुल करता आली पाहिजे
तेच खर धाडस आहे.शुभ सकाळ
आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो.. आपला दिवस आनंदी जावो!
शुभ सकाळ
आपण आपले “गुण” ओळखावे, “दोष” सांगण्यासाठी लोक आहेतच….. पाऊल टाकायचे असेल तर “पुढे” टाकावे, “मागे” ओढायला लोक आहेतच….. स्वप्न पाहायचे असतील तर “मोठेपणाचे” पहावे, “कमीपणा” दाखवायला लोक आहेतच.
कुणी तरी पुढे गेला म्हणून, द्वेष करत बसण्यापेक्षा, आपण मागे का राहीलो? हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वत:शी करा जगाशी नाही. ‼️
शुभ सकाळ
सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो,
काहींना ओंजळभर मिळते,
तर काहींना रांजणभर;
पण त्यातून मिळणारा आनंद
ज्याला कळला तोच जगणे शिकला”…
दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.
फक्त थोड़ी वाट पहायची असते…!!!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”…..
“मनात” घर करून गेलेली व्यक्ती, कधीच विसरता येत नाही.. “घर” छोटे असले तरी चालेल, पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे.. मला श्रीमंत होण्याची गरज नाही.. मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती…शुभ सकाळ!
चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात… कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते… चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाही…..
*शुभ सकाळ*