केसांच्या वाढीसाठी अशा पद्धतीने करा लसणीचा वापर
सर्वच महिला आणि पुरुषांमध्ये केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. केस गळायला सुरुवात झाल्यानंतर टक्कल पडेल की काय अशी भीती वाटू लागते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर ऋतूंमध्ये केस गळणे, कोंडा होणे, टाळू संसर्ग इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. केसांच्या घनदाट आणि मजबूत वाढीसाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. घरगुती उपाय केल्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस गळती सुद्धा थांबते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला केसांच्या मजबूत वाढीसाठी लसणाचा वापर कसा करायचा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
केसांच्या वाढीसाठी अशा पद्धतीने करा लसणीचा वापर
जेवणातील सर्वच पदार्थ बनवण्यासाठी लसणीचा वापर केला जातो. लसणीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. लसणीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, नियासिन आणि थायामिन भरपूर प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे केस, त्वचा आणि आरोग्याला सुद्धा फायदे होतात. तसेच लसणीच्या पांढऱ्या कळ्यांमध्ये प्रोटीन, कार्ब्स, मॅगनीज, विटामिन बी6, व्हिटॅमिन विटामिन सी, सेलेनियम आणि फायबर असते.लसणी सह लसणीच्या सालीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरस गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे अनेक महिला केसांच्या वाढीसाठी लसणीपासून बनवलेले तेल वापरतात.
हे देखील वाचा: दिवसाची सुरुवात करा ‘या’ भारतीय खाद्यपदार्थांनी; वजन होईल कमी पारंपरिक पद्धतीने
एका बाटलीमध्ये 100 मिली पाणी घ्या. त्यानंतर त्यात बारीक चेचलेली लसूण टाकून लगेच झाकण बंद करा. लसणीमध्ये असलेले ॲलिसीन केसांच्या वाढीसाठी उपयोगी ठरते. झाकण लावून ठेवलेली बाटली २ दिवस तशीच ठेवून घ्या. त्यानंतर दोन दिवसांनी बाटलीमधील पाणी गाळून केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या. हे पाणी केस धुवण्याच्या २ ते ३ तास आधी लावून ठेवा. जेणेकरून केसांच्या मुळांना लसणीचे पाणी लागेल. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा हा उपाय केल्यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल. यामुळे केसांचे गळणे कमी होऊन केसांची वाढ चांगली होईल.