केसांची वाढ खुंटली आहे? मग सकाळी उठल्यानंतर नियमित खा 'हे' पदार्थ, १५ दिवसांमध्ये दिसून येईल सकारात्मक बदल

Hair Fall: केसांच्या वाढीसाठी नियमित आहारात बदाम खाणे आवश्यक आहे. बदाम खाल्ल्यामुळे केसांची वाढ होण्यासोबतच केसांना आवश्यक पोषण मिळते आणि शरीरात वाढलेला थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.
केसांची वाढ खुंटली आहे? मग सकाळी उठल्यानंतर नियमित खा 'हे' पदार्थ
केसांची वाढ खुंटली आहे? मग सकाळी उठल्यानंतर नियमित खा 'हे' पदार्थ
Published on: 
Updated on: 
  • केसांची वाढ न होण्याची कारणे?

  • केसांच्या वाढीसाठी नियमित खा हे पदार्थ?

  • केस गळण्याची कारणे?

हल्ली तरुण वयात शरीरसोबतच केसांच्या समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. केस गळणे, केस तुटणे, केस कोरडे होणे, केसांमध्ये कोंडा होणे तर काहीवेळा टाळूवर इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर कायमच दुर्लक्ष केले जाते. केसांमध्ये टक्कल पडल्यास केसांचे सौंदर्य कमी होऊन जाते. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला वारंवार वेगवेगळे शाम्पू, कंडिशनर, हेअर सीरम इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण केसांच्या वाढीसाठी कायमच महागड्या ट्रीट्मेंट करणे आवश्यक नाही.

केसांची वाढ खुंटली आहे? मग सकाळी उठल्यानंतर नियमित खा 'हे' पदार्थ
Skin Care Tips: सुरकुत्या- पिंपल्स कायमचे होतील गायब! आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावा जायफळाचा आयुर्वेदिक लेप

महागडे शॅम्पू, हेअर ऑईल्स आणि वेगवेगळ्या ट्रिटमेंट्स आधार केसांच्या वाढीसाठी केला जातो. पण हानिकारक केमिकलचा वापर करून बनवलेले प्रॉडक्ट केसांची वाढ करण्याऐवजी केस आणखीनच कमकुवत करतात. केसांची वाढ होण्यासाठी कायमच महागड्या हेअर ट्रीटमेंट करण्याऐवजी केसांना आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते आणि केस चमकदार होतात. केस मजबूत आणि चमकदार होण्यासाठी नियमित सकाळी या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.

केस गळण्याची कारणे:

शरीरात प्रोटीन, आयर्न, जिंक, बायोटीन किंवा विटामिनची कमतरता उद्भवते. यामुळे केस खूप जास्त कमकुवत होतात. पोषक तत्वांची कमतरता, ताण-तणाव, हॉर्मोनल बदल, अनुवांशिक कारणे, झोपेची कमतरता, चुकीची हेअर केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यामुळे केस गळणे थांबवण्यासाठी रात्री भिजत घातलेले बदाम खाणे आवश्यक आहे. बदाम खाल्ल्यामुळे केस गळणे थांबते आणि केसांना आवश्यक पोषक मिळते.

केसांची वाढ खुंटली आहे? मग सकाळी उठल्यानंतर नियमित खा 'हे' पदार्थ
Face Pack: हिवाळ्यात त्वचेवर पांढरा थर तयार झाला आहे? मग 'या' फेसपॅकने काळवंडलेली त्वचा होईल चमकदार आणि स्मूथ

केसांच्या वाढीसाठी खा 'हे' पदार्थ:

बदाममध्ये विटामिन ई, प्रोटीन, मॅग्नेशियम, जिंक आणि हेल्दी फॅट्स इत्यादी घटक असतात. यामध्ये विटामिन ई आणि अँटीऑक्सिडेंट्सप्रमाणे घटक असतात. यामुळे हानिकारक पेशींपासून शरीराचे नुकसान होत नाही. केसांच्या वाढीसाठी केराटीन नावाच्या प्रोटीनपासून तयार होतात. त्यामुळे संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि झिंक इत्यादी अनेक घटक असतात. नियमित बदाम खाणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. रात्री झोपण्याआधी नियमित ५ ते ६ बदाम पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर बदामाची साल काढून बदाम खाल्ल्यास केस आणि शरीरावर सकारात्मक बदल होतात.