
रोज कच्चा तांदूळ खाण्याची सवय हळूहळू शरीरात गंभीर समस्या निर्माण करु शकते. शरीरात व्हिटामीनची कमतरता निर्माण झाली की, अशी सवय लागते मात्र हीच सवय शरीराला घातक ठरु शकते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
आयर्न (लोह) कमी होणे
शरीरात आयर्न कमी असेल तर शरीर विचित्र cravings निर्माण करते. जेव्हा आयर्न कमी होतं तेव्हा दम लागणे केस गळणे,नखे पातळ किंवा तडकतात, चक्कर येणे, लक्ष कमी लागणे अशा समस्या वाढतात. त्यामुळे शरीराला काहीतरी खाणं हवं असतं तेव्हा अनेकांना कच्चे तांदूळ खावेसे वाटतात.
कधी कधी अचानक कच्चे तांदूळ खावेसे वाटणे ही गोष्ट , विचित्र क्रेविंग वाटू शकते, पण यामागे शरीरातील काही पोषणतत्वांच्या कमतरता किंवा मानसिक स्थितीशी संबंधित महत्त्वाची कारणे दडलेली असू शकतात. वैद्यकीय भाषेत अशा कच्च खाण्याची इच्छा होत असल्यास याला Pica (पिका) असे म्हणतात. हा विकार विशेषतः लोहअभाव (Iron Deficiency) आढळल्यावर दिसून येतो.
लोहाची कमतरता झाल्यावर शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते. यामुळे रक्तातील ऑक्सिजन कमी होतो आणि त्याचा थेट परिणाम उर्जेवर, मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि पचनक्रियेवर होतो. या अवस्थेत शरीर काही वेगळ्या व विचित्र इच्छा निर्माण करते, त्यापैकी कच्चे तांदूळ खाण्याची इच्छा सर्वसाधारण आहे. यासोबतच केस गळणे, नखे तडकणे, वारंवार थकवा जाणवणे, चक्कर येणे, त्वचा फिकट दिसणे अशी लक्षणे दिसू शकतात.
कच्चे तांदूळ खाण्याची इच्छा झिंकच्या (Zinc) कमतरतेमुळेही होऊ शकते. काही व्यक्तींमध्ये चिंता, ताणतणाव किंवा भावनिक अस्थिरता वाढल्यावरही अशा प्रकारच्या सवयी निर्माण होतात. विशेषतः गर्भावस्थेत महिलांमध्ये हे क्रेविंग अधिक आढळते, कारण त्या काळात शरीरात आयर्नची मागणी वाढलेली असते.
तांदूळ कच्चे खाण्याचे तोटे देखील आहेत—पचन बिघडणे, पोटात कडकपणा येणे, दातांना इजा होणे किंवा जंतसंसर्ग होण्याची शक्यता वाढणे. त्यामुळे ही सवय वेळीच सोडणं गरजेचं आहे. अशी क्रेविंग सतत होत असेल तर CBC व Ferritin सारख्या रक्त तपासण्या करून लोहतत्त्वांची पातळी तपासणे आवश्यक आहे. आहारात पालक, चणे, तिळ, खजूर, बीट यांसारखे लोहयुक्त पदार्थ वाढवणे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने आयर्न किंवा झिंक सप्लिमेंट्स घेणे फायदेशीर ठरते.
Ans: लोह कमी झाल्यावर शरीरात विचित्र प्रकारच्या cravings निर्माण होतात. मेंदू चुकीच्या सिग्नल्स निर्माण करतो आणि अपक्व वस्तू खाण्याची इच्छा होते.
Ans: अन्न नसलेल्या किंवा अपक्व वस्तू खाण्याची तीव्र इच्छा होण्याला पिका विकार म्हणतात. हे बहुधा पोषक कमतरता, ताण किंवा मानसिक स्थितींशी संबंधित असते.
Ans: मुख्यत्वे लोहाची (Iron) कमतरता याचे सर्वात मोठे कारण आहे. कधी कधी झिंकची कमी आणि गर्भावस्थेमधील पोषण गरजाही कारणीभूत ठरू शकतात.