रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा 'या' गोष्टी, हिवाळ्यातही त्वचा राहील कायमच चमकदार आणि सुंदर
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची कारणे?
कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर केल्यास त्वचा सुंदर होईल?
चेहऱ्यावरील सुरकुत्या कोरडेपणा कमी करण्यासाठी उपाय?
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. कारण वातावरणातील गारव्याचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर रॅश येणे, त्वचा निस्तेज होणे, त्वचा काळवंडून जाणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. संपूर्ण दिवसभर थंड वारा, कमी आर्द्रता आणि कोरड्या वातावरणाचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. याशिवाय जीवनशैलीतील होणाऱ्या बदलांमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, डार्क सर्कल , त्वचा ओढल्यासारखी वाटू लागते. यासोबतच ओठ फुटणे, पायांमध्ये भेगा येणे, फुटलेल्या ओठांमधून रक्त येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हिवाळ्यात त्वचेसंबंधित वाढलेल्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअरचा वापर करतात. पण सतत केमिकल युक्त प्रॉडक्ट त्वचेवर लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो.(फोटो सौजन्य – istock)
लग्नापूर्वी उजळ त्वचा हवीये, ‘अशी’ घ्या तुमच्या त्वचेची काळजी, नवऱ्याची नजरच हटणार नाही
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित समस्या वाढू लागतात. या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपचार करावेत. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. कोणत्याही स्किन केअरचा वापर कायमच रात्रीच्या वेळी करावा. कारण रात्रीचा वेळ त्वचा दुरुस्तीसाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. आज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कोणते पदार्थ लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ त्वचेवर लावल्यास त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारून चेहरा सुंदर आणि चमकदार दिसेल.
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी शिया बटर, कोको बटर, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल इत्यादी पदार्थांचा वापर करावा. या पदार्थांच्या वापरामुळे त्वचा खूप जास्त हायड्रेट आणि मॉइश्चरायझ होण्यास मदत होते. हे पदार्थ चेहऱ्यावर एक चांगला थर निर्माण करून त्वचेची पोत आणि गुणवत्ता सुधारतात.
तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल तर रात्री झोपण्याआधी हायल्यूरॉनिक ऍसिड असलेल्या सिरमचा वापर करावा. यामध्ये असलेले घटक त्वचेतील ओलावा कायम टिकवून ठेवतात आणि त्वचा चमकदार सुंदर करतात. त्वचा मऊ आणि मुलायम करण्यासाठी हायल्यूरॉनिक ऍसिड असलेले सीरम रात्री झोपताना नियमित लावावे.
थंडीत चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा, सुरकुत्या आणि टॅन कमी करण्यासाठी विटामिन ई चा वापर करावा. कोणत्याही क्रीममध्ये विटामिन ई मिक्स करून रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावावे. यामुळे सुरकुत्या कमी होण्यासोबतच त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळते. विटामिन ई हे एक नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट आहे, ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते.
कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी गुलाबाचे तेल, बदाम तेल, ऑर्गन ऑइल किंवा जोजोबा तेल इत्यादी तेलांचा वापर करू शकता. या तेलामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा अधिक सुंदर होते. थंडीत चेहऱ्यावर लालसरपणा वाढल्यानंतर त्वचा मॉइश्चराज आणि थंड करणाऱ्या क्रीमचा वापर करावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते.






