मीठाचे प्रकार
जेवणाची चव वाढवण्यासाठी सर्वच पदार्थांमध्ये मिठाचा वापर केला जातो. मिठाशिवाय जेवणाची चव लागत नाही.मिठामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यसाठी चांगले असतात. त्यामुळे नेहमी जेवण बनवताना मिठाचा वापर केला जातो. पण जेवणात काहीवेळा जेवणात मीठ जास्त वापरले जाते. मिठाच्या अतिपवापरामुळे जेवणाची चव पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे पदार्थ तयार करत असताना जेवणात जास्त मीठ टाकून नये. मिठाच्या अतिसेवनामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. उच्च रक्दाब वाढल्यानंतर किडनीसंबंधित समस्या उद्भवू शकतात. जेवणात मीठ जास्त पडल्यानंतर पोटासंबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. या सर्व समस्या टाळण्यासाठी आहारात योग्य मीठ वापरणे गरजेचे आहे., त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आरोग्यसाठी कोणते मीठ चांगले आहे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: पावसाळ्यात पहाटेचा पहिला सूर्यप्रकाश आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
मीठाचे प्रकार
प्रामुख्याने पांढरे किंवा समुद्री मीठ जेवण बनवण्यासाठी वापरले जाते. जेवणात वापरले जाणारे मीठ बारीक असते. समुद्राचे पाण्याची वाफ झाल्यानंतर त्याचे बाष्पीभवन होते. त्यानंतर त्याचे रूपांतर मिठामध्ये होते. प्रक्रिया करण्याआधी मीठ तपकिरी रंगाचे असते. त्यानंतर मिठावर प्रक्रिया केल्यानंतर पांढऱ्या रंगाचे मीठ तयार केले जाते. हे मीठ आरोग्यसाठी सुद्धा चांगले आहे.
मीठाचे प्रकार
रॉक सॉल्टचा वापर सरबत किंवा जेवण बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. सिंध प्रदेशातील हिमालयातून हे मीठ आणले जाते. त्यामुळेच या मिठाला हिमालय, रॉक आणि गुलाबी मीठ असेसुद्धा बोलले जाते. या मिठाचा रंग हलका गुलाबी रंगाचा असतो. जेवणामध्ये जर रॉक सॉल्टचा वापर केल्यास छातीत जळजळ, बद्धकोष्ठता, सूज इत्यादी समस्या उद्भवत नाहीत.
हे देखील वाचा:मानसिक शांततेसाठी या व्यक्तींपासून दूर राहा..
मीठाचे प्रकार
काळे मीठ नैसर्गिक नसते. या मिठाचा वापर जेवणात केला जात नाही. काळ्या मिठाचे तुकडे करून भट्टीत तयार केले जातात. आवळा आणि मायरोबलन बिया पाण्यात मिसळून भट्टीत गरम केल्या जातात. त्यानंतर ते ३ ते ४ तास गरम केल्यानंतर हे मीठ तयार होते. काळ्या मिठामुळे पचनसंबंधित समस्या दूर होतात. छातीमध्ये जळजळ होण्यापासून आराम मिळतो.