पहाटेचा पहिला सूर्यप्रकाश आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
पावसाळाचे देशभरात सगळीकडे जोरदार आगमन झाले आहे. पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे थंड वातावरण होते. वातावरणात थंडावा असल्याने सगळीकडे आनंद आणि उत्साह असतो.अनेक लोक सकाळी पहाटेच्या वेळी लवकर उठतात. लवकर उठल्यानंतर आरोग्यसुद्धा फायदे होतात. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणाऱ्या लोकांचे आरोग्य निरोगी असते. त्यांना मानसिक आणि शारीरिक समस्या शक्यतो उद्भवत नाहीत. सकाळी उठल्यानंतर पहाटेचा सूर्यप्रकाश आरोग्यसाठी फायदेशीर असतो. या सूर्यप्रकाशामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पहाटेच्या सूर्यप्रकाशात फिरून आल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, जे त्वचेच्या संसर्गापासून मुक्ती देण्यासाठी प्रभावी आहे. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यातील पहाटेच्या सूर्यप्रकाशामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
पहाटेचा पहिला सूर्यप्रकाश आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
पावसाळ्यात हवेमध्ये ओलावा असल्याने अनेकांना मॉइश्चरायझर लावणे आवडत नाही. पण यामुळे त्वचा कोरडी होऊन जाते. तसेच कोरड्या त्वचेमुळे आणि प्रदूषणामुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे त्वचेच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी पहाटे लवकर उठवून पहिल्या सूर्यप्रकाशात जावे. यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
हे देखील वाचा: वजन वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ घरगुती पदार्थांचा समावेश,काही दिवसांमध्ये दिसेल फरक
वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हवेतील प्रदूषणामुळे त्वचा लगेच खराब होऊन जाते. यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात.एक्जिमा हा एक गंभीर आजार आहे. या आजारापासून त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सकाळच्या पहिल्या सूर्यप्रकाशामध्ये जावे. त्वचेवरील डाग, खाज इत्यादी आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी रोज ३० मिनिटं पहाटेच्या सूर्यप्रकाशात चालावे.
पहाटेचा पहिला सूर्यप्रकाश आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
तेलकट किंवा चिकट त्वचा झाल्यानंतर चेहऱ्यावर मुरूम येऊ लागते. मुरुमांमुळे संपूर्ण त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे मुरुमांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी रोज सकाळी पहाटेच्या सूर्यप्रकाशात चालण्यासाठी जावे. हार्मोनल बदलांमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे चेहऱ्यावर मुरूम येतात.
शरीरातील विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पहाटेच्या सूर्यप्रकाशामध्ये जाऊन बसावे. यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. तसेच व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होईल.
हे देखील वाचा: सांधेदुखीच्या त्रासाने त्रस्त आहात? तर रिकाम्या पोटी करा ‘या’ पावडरचे सेवन, आरोग्याला होतील फायदे
पहाटेचा पहिला सूर्यप्रकाश आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
शरीरातील रक्त भिसरण सुधारण्यासाठी पहाटेच्या सूर्यप्रकाशात जाऊन बसावे. हा सूर्यप्रकाश त्वचा, आरोग्यसाठी चांगला आहे. सूर्याच्या पहिल्या किरणांमुळे त्वचेचे रक्तभिसरण सुधारते. जर तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असेल तर पहाटेच्या सूर्यप्रकाशात ३० मिनिटं जाऊन बसावे. सूर्यप्रकाशामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि सुंदर दिसते.