Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारात नाचणीचे सेवन करावे, आरोग्याला होतील फायदे

नाचणीचे सेवन केल्याने शरीराला फायदे होतात. नाचणीपासून अनेक खाद्यपदार्थ बनवले जातात जे हाडांच्या विकासासाठी आणि मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया नाचणी खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2024 | 12:10 PM
मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारात नाचणीचे सेवन करावे, आरोग्याला होतील फायदे
Follow Us
Close
Follow Us:

नाचणी (Ragi) आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. नाचणी हे एक कडधान्य असून यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक आणि आरोग्यासाठी महत्वाचे असलेले गुणकारी घटक आढळतात. नाचणीमध्ये फायबर, कॅल्शियम, विटामिन, जीवास्तवे आढळून येतात. तसेच मधुमेहचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारात नाचणीचे सेवन करावे. यामुळे मधुमेहाची पातळी नियंत्रणात राहून आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. वजन कमी करण्यासाठी नाचणीचे सेवन तुम्ही आहारात करू शकता.

भारतातमधील कर्नाटकात सार्वधिक नाचणीचे पीक घेतले जाते. भारतासह आफ्रिका आणि इतर देशांमध्ये नाचणी पिकवली जाते. नाचणीपासून भाकरी, नाचणीचे सत्व, पापड, लाडू. कुरडया इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी नाचणीचा वापर केला जातो. यामध्ये फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, जिंक, लोह आणि कॅल्शियम अशी शरीराला आवश्यक असणारी सर्व गुणधर्म आढळतात. पण अनेकांना नाचणी खाण्याचे काय फायदे होतात हे माहित नसतं. आज आम्ही तुम्हाला नाचणी खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया नाचणी खाण्याचे फायदे.(फोटो सौजन्य: istock)

[read_also content=”उन्हाळयात त्वचेवर येणारी खाज, घामोळे ‘या’ दोन पानांच्या वापराने नाहीशी होईल https://www.navarashtra.com/lifestyle/in-summer-itching-sweating-problems-will-disappear-with-the-use-of-these-two-leaves-541044.html”]

नाचणी खाण्याचे आरोग्यदायी फायदे:

रक्तातील साखर नियंत्रणात राहते:

जगभरातील अनेक लोक मधुमेहाच्या त्रासानी त्रस्त आहेत. मधुमेह आजार असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी आहारात नाचणीचे सेवन करावे. नाचणीची भाकरी किंवा इतर पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. नाचणीमध्ये हाय प्रोटिन्स असतात ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

पचनसंस्था सुधारते:

उन्हाळ्यात किंवा इतर ऋतूंमध्ये पचनासंबंधित समस्या सगळ्यांचं जाणवतात. अशावेळी तेलकट किंवा बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे. अशावेळी तुम्ही नाश्त्यात नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. नाचणीला मोड आल्यानंतर बनवलेला सार पचनासाठी हलका असतो. यामुळे पचनसंस्था मजबूत राहते.

हाडांचे आरोग्य सुधारते:

नाचणीमध्ये असलेले कॅल्शियम हाडांच्या विकासासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे लहान मुलांना जेवणात नाचणी सत्व किंवा नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्यासाठी देतात. हाडांच्या विकासासाठी आवश्यक असलेले पोषक घटक नाचणीमध्ये असतात. पौष्टिक पदार्थांमध्ये तुम्ही नाचणीचा समावेश करू शकता.

त्वचेसाठी फायदेशीर:

सर्वच ऋतूंमध्ये त्वचेसंबंधित समस्या जाणवतात. त्यामुळे त्वचेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. नाचणीमध्ये फेरूलिक असिडव असते जे त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी मदत करते यामध्ये असणारे अँटिएजिंग गुण तुमची त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार करण्यास मदत करते. तसेच तुम्ही घरच्या घरी नाचणीपासून फेस मास्कसुद्धा बनवू शकता.

[read_also content=”रोज सकाळी एक वाटी कडधान्य खाल्ल्याने शरीराला होतील आशचर्यकारक फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/health-benefits-of-eating-sprouts-in-morning-541010.html”]

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त:

वजन कमी करण्यासाठी नाचणीपासून बनवलेले पदार्थांचे आहारात सेवन करा. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहून पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या आहे अशांनी नाचणीचे सेवन केले पाहिजे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Healthy benefits of eating nachni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2024 | 12:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.