चवीला गोड असलेल्या पपईचे आरोग्याला अनेक गुणकारी फायदे आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पपई हे फळ खायला खूप आवडत.चवीला गोड आणि पिवळ्या रंगाची पपई आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पपईमध्ये अनेक जीवनसत्व आणि खनिजे आढळून येतात. पपईमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, लोह, विटामिन ए, बी, सी यांसारखे अनेक गुणधर्म आढळून येतात. पचनसंस्था निरोगी राहून पोटासंबंधित अनेक समस्या दूर होतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहून आरोग्य निरोगी राहते. पपई सोबतच पपईच्या पानांचे सुद्धा आरोग्यासाठी गुणकारी फायदे आहेत.
पपईच्या पानांचा रस बनवून प्यायला जातो. या पानांमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी प्रभावी आहेत. आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम पपईचे पाने करतात. आज आम्ही तुम्हाला पपईच्या पानांचा रस करून प्यायल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात. याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य- Istock)
पपईच्या पानाचा रस प्यायल्याने आरोग्याला होतील फायदे:
रक्तातील साखर नियंत्रणात राहते:
मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी रोजच्या आहारात पपईच्या पानांचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहून आरोग्याला फायदे होतात. स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करून पेशींचे रक्षण केले जाते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे सरबत घेतल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
[read_also content=”स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही देखील टॅटू काढलाय? तर यामुळे उद्भवू शकतात जीवघेणे आजार https://www.navarashtra.com/lifestyle/side-effects-of-tattoo-544090.html”]
पचनक्रिया सुधारते:
पपई खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहून शरीर निरोगी राहते. पपईच्या पानांमध्ये फायबर आढळून येते. यामुळे गॅस, ब्लोटिंग आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून शरीराचे संरक्षण होते.पानांमधील फायबर हे आतड्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.
रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते:
पपईच्या पानांमध्ये विटामिन ए, सी, इ असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. यातील अँटिऑक्सिडंट्स ,ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. यामुळे संसर्गजन्य रोगांपासून पेशींचे होणारे नुकसान टाळता येते.
[read_also content=”साबुदाणा भिजवायला विसरलात? मग चिंता सोडा, अवघ्या १०मिनिटांत अशी बनवा स्वादिष्ट खिचडी https://www.navarashtra.com/lifestyle/forgot-to-soak-sabudana-dont-worry-try-these-method-and-make-sabudana-khichdi-in-just-10-minutes-544100.html”]
डेंग्यूसाठी उपयुक्त:
डेंग्यू झाल्यानंतर शरीरातील कमी झालेल्या पेशी वाढण्यासाठी पपईच्या पानांचा रस प्यायला जातो. यामुळे पांढऱ्या पेशी वाढून शरीराला आराम मिळतो. शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यानंतर अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे डेंग्यू झाल्यानंतर योग्य वेळात औषध उपचार घेणे आवश्यक आहे. पपईची पाने पेशी वाढवण्यास मदत करतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.