त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी हर्बल टी
सुंदर आणि चमकदार मिळवण्यासाठी सर्वच महिला, मुली काहींना काही उपाय करत असतात. कधी पार्लरमध्ये जाऊन केमिकल ट्रीटमेंट करतात, तर काहीवेळा घरगुती उपाय केले जातात. हे उपाय केल्यानंतर काहीवेळ त्वचा खूप सुंदर आणि चमकदार दिसू लागते. सर्वच महिलांना आपले सौदंर्य कधी कमी होऊ नये असे नेहमीच वाटत असते. पण वाढत्या वयानुसार आणि इतर कारणांमुळे त्वचेमध्ये बदल होऊ लागतात. सुंदर दिसण्यासाठी बाजारात मिळणारे महागडे ब्युटी प्रॉडक्ट लावण्याऐवजी घरगुती आणि शरीराला आतून पोषण देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. त्वचा आतून निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तसेच पाणीदार फळांचे सेवन करावे, ज्यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहते.
सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. कधी ज्युस पिणे तर कधी फळांचे सेवन करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर त्वचा मिळवण्यासाठी हर्बल टी कशी तयार करावी? याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हर्बल टी मध्ये असलेले गुणधर्म त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यास मदत करतील. तसेच शरीराला आतून पोषण मिळेल. या चहाचे नियमित सेवन केल्यास त्वचेवरील डाग, पिंपल्स, मुरूम निघून जाण्यास मदत होईल. हर्बल टी चे सेवन केल्यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: केसांच्या वाढीसाठी अशाप्रकारे करा मधाचा वापर
हे देखील वाचा: त्वचेसंबंधित ‘या’ लक्षणांमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, शरीरातील अवयव होऊ शकतात निकामी