फोटो सौजन्य - Social Media
ह्यूमन इम्यूनोडेफिशिएंसी व्हायरस (एचआयव्ही) हा एक गंभीर आणि धोकादायक विषाणू आहे, जो मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमकुवत करतो. यामुळे शरीर इतर आजारांशी लढण्याची ताकद गमावते आणि व्यक्ती सहजपणे संसर्गजन्य आजारांचा बळी ठरतो. एचआयव्ही वेळीच ओळखणे आणि तात्काळ उपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अन्यथा हा आजार पुढे जाऊन एड्समध्ये (Acquired Immunodeficiency Syndrome) रुपांतरित होऊ शकतो, जो प्राणघातक ठरतो.
गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयात कार्यरत मेडिसिन आणि जनरल फिजिशियन डॉ. ए. पी. सिंह यांच्या मते, एचआयव्हीचे सुरुवातीचे लक्षणे सामान्य फ्लूप्रमाणे असू शकतात. त्यामुळे अनेक वेळा ही लक्षणे दुर्लक्षिली जातात. जर कधी तुम्ही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले असतील, संक्रमित सुई वापरली असेल किंवा तुमच्यावर एचआयव्हीचा धोका आहे असं वाटत असेल, आणि खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील, तर त्वरित चाचणी करून घेणे गरजेचे आहे.
एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे:
कधी करावी चाचणी?
जर तुम्ही एचआयव्हीच्या जोखमीच्या स्थितीत गेला असाल, तर कोणतीही लक्षणे दिसताच विलंब न करता एचआयव्ही चाचणी करावी. कारण जितक्या लवकर निदान होईल, तितक्या लवकर उपचार सुरू होऊन आरटी (ART – Antiretroviral Therapy) द्वारे विषाणूवर नियंत्रण मिळवता येईल.
एचआयव्हीवर वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण एक सामान्य, निरोगी जीवन जगू शकतो. त्यामुळे घाबरून न जाता जागरूक राहा, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.