हिवाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन:
हिवाळ्यामध्ये आरोग्यासह त्वचासुद्धा कोरडी होऊन जाते. त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचा कोरडी पडणे, खाज येणे, चेहऱ्यावर लाल चट्टे उठणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शिवाय डिसेंबर महिना लग्नसराईचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात सगळीकडे वातावरणात गारवा असतो. शिवाय थंडी वाढल्यामुळे त्वचा हळूहळू खराब होण्यास सुरुवात होते. खराब झालेली त्वचा पुन्हा सुधारण्यासाठी महिला पार्लर, सलोनमध्ये जाऊन अनेक वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. तर काही महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट लावतात. यामुळे त्वचा काहीकाळ सुंदर दिसते, पण कालांतराने त्वचा पुन्हा एकदा निस्तेज आणि कोरडी होतो. कोरड्या त्वचेवर मेकअप केल्यानंतर मेकअप फारकाळ टिकून राहत नाही.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी केमिकल प्रॉडक्ट न लावता घरगुती पदार्थांचे सेवन करून घ्यावी. त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. त्वचेला पोषण देण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थंडीमध्ये त्वचा ग्लोइंग करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहते आणि उजळदार होते.
तूप खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी रोजच्या आहारात तुपाचे सेवन करावे. तूप खाल्यामुळे त्वचेवर ग्लो येतो आणि त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. शिवाय तुपामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात कमीत कमी एक चमचा तुपाचे सेवन करावे. यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि सुंदर होण्यास मदत होईल. थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून प्यावे. यामुळे पोट स्वच्छ होईल आणि त्वचा चमकदार दिसेल.
लोहयुक्त बीट आणि गाजराचे सेवन सर्वच ऋतूंमध्ये करावे. हिवाळ्यात बाजारामध्ये बीट आणि गाजर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. अनेकांना गाजर बीट नुसतंच खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही गाजर आणि बीटचा ज्युस बनवून पिऊ शकता. यामुळे शरीरातील लोहाची पातळी वाढेल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. गाजर आणि बीटचे सेवन केल्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो. शिवाय अनेक फायदे सुद्धा होतात.
हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी आणि शरीरातील उष्णता कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात तीळ आणि गुळाचे सेवन करावे. शिवाय या दिवसांमध्ये तीळ आणि गुळाचे लाडू सुद्धा बनवले जातात. तीळ आणि गुळाचे लाडू खाल्यामुळे रक्त वाढते. शिवाय गूळ त्वचा डिटॉक्स करण्याचे काम करत. त्यामुळे नियमित सकाळी उठल्यानंतर तीळ आणि गुळाचे सेवन करावे.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री उपलब्ध असतात. संत्री खाल्यामुळे शरीरातील विटामिन सी ची पातळी वाढते. शिवाय सर्दी खोकल्याची समस्या उद्भवत नाही. त्यामुळे हिवाळ्यात नियमित एक संत्र्याचे सेवन करावे. संत्र खाल्यामुळे त्वचेवर चमकदार ग्लो येतो आणि त्वचा सुंदर दिसू लागते. तसेच यामध्ये असलेल्या फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.