हिवाळ्यात आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. सतत सर्दी, खोकला, ताप येणे इत्यादी साथीच्या आजारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. हिवाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात जास्वंदीच्या फुलांचा चहा प्या. शिवाय आहारात हिरव्या भाज्या, हर्बल ड्रिंक्स इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. जास्वंदीच्या फुलांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
जास्वंदीच्या फुलांचा चहा पिण्याचे फायदे
जास्वंदीच्या फुलांमध्ये आढळून येणारे अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यासाठी ही फुले मदत करतात. या फुलांचा चहा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा चहा पिऊ शकता. सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यावा.
जास्वंदीच्या फुलात आढळून येणारे अँटी-बॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासायटिक गुणधर्म जिवाणू, बुरशीजन्य आणि इतर अनेक प्रकारचे शारीरिक संसर्ग टाळण्यासाठी मदत करतात.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यावा. ॲसिडिटी किंवा अपचनची समस्या उद्भवत नाही आणि आरोग्य निरोगी राहते.
शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्याचे काम जास्वंदीचा चहा करतो. हा चहा बनवण्यासाठी गरम पाण्यात जास्वंदीची फुले उकळवा. त्यानंतर त्यातील फुले गाळून त्यात मध मिक्स करून चहाचे सेवन करा.