हिवाळ्यात पायांना पडलेल्या भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय
राज्यभरात थंडीचे प्रमाण काहीसे वाढले आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. अन्यथा आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. या दिवसांमध्ये त्वचा कोरडी होणे, पायांना भेगा पडणे, हातापायांची त्वचा निघून जाणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात किंवा बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स लावतात. पण या सगळ्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही थंडीच्या दिवसांमध्ये पायांना सतत भेगा पडतात. वातावरणात निर्माण झालेल्या थंडाव्यामुळे आरोग्य आणखीनच बिघडू लागते. पायांना भेगा पडल्यानंतर पायांमधून रक्त येण्यास सुरुवात होते. शिवाय संसर्गाचा धोका वाढू लागतो.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा वाढू लागल्यानंतर पायांमध्ये तीव्र वेदना होऊ लागतात. शिवाय यामुळे जमिनीवर पाय ठेवणं सुद्धा कठीण होऊन जात. हिवाळ्यात टाचांना पडलेल्या भेगांमुळे महिलांचं नाहीतर पुरुषांना सुद्धा त्रास होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पायांना पडलेल्या भेगा कमी करण्यासाठी मेणबत्तीचा कसा वापर करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पायांना मोठ्या प्रमाणावर भेगा पडतात. या भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय करून पाहावे. यामुळे पायांमधील वेदना कमी होण्यास मदत होईल शिवाय पायांची त्वचा मुलायम होईल. यासाठी वाटीमध्ये सर्वप्रथम मेणबत्तीच्या मेण काढून घ्या. त्यानंतर मेणाच्या तुकड्यांमध्ये पेट्रोलियम जेली, खोबरेल तेल, विटामिन ई कॅप्सूल टाकून मिक्स करून घ्या. कढईमध्ये पाणी गरम करून त्यात तयार करून घेतलेल्या मिश्रणाची वाटी ठेवून मेण व्यवस्थित विरघळवून सर्व साहित्य मिक्स करा. त्यानंतर त्यात बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्या.
तयार केलेले मिश्रण शक्यतो रात्रीच्या वेळी पायांना लावावे. पायांना भेगा पडलेल्या ठिकाणी पाय स्वच्छ करून घ्या. पाण्याने पाय धुतल्यानंतर कपड्याच्या सहाय्याने पाय कोरडे करा. त्यानंतर चमचा किंवा सुरीच्या सहाय्याने तयार केलेले मिश्रण पायांवर व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं मिश्रण लावून ठेवल्यानंतर मेणबत्तीचे मिश्रण सुकल्यावर चमच्या सहाय्याने खरडवून काढून घ्या. हा उपाय केल्यामुळे पायांच्या भेगा भरण्यास मदत होईल. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास पायांच्या भेगा भरण्यास मदत होईल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा