सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय
देशभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडी सुरु झाल्यानंतर त्वचा कोरडी होऊन जाते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे ही सामान्य समस्या आहे. थंडी पडण्यास सुरुवात झाल्यानंतर त्वचा ड्राय होऊ लागते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या किंवा बारीक रेषा दिसू लागतात. या दिवसांमध्ये त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. अशावेळी महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम्स किंवा ब्युटी प्रॉडक्ट लावतात. पण या प्रॉडक्टचा फार काळ त्वचेवर प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे त्वचेला लावण्यासाठी प्रामुख्याने घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अशाप्रकारे वापरा कापूर
त्वचेवरील नैसर्गिक सौदंर्य टिकवून ठेवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थ त्वचेसाठी हानिकारक ठरत नाहीतर त्वचेला यामुळे अनेक फायदे होतात. थंडीमुळे खराब झालेली त्वचा पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. भेगा पडलेली, सुरकुतलेली त्वचा मेकअप केल्यानंतर सुद्धा चांगली दिसत नाही. त्यामुळे सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी नेहमी स्किन केअर रुटीन फॉलो करावे. स्किन केअर रुटीन फॉलो केल्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. आज आम्ही तुम्हाला थंडीमुळे हातापायांवर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा चांगली होईल.
थंडीच्या दिवसांमध्ये हात आणि पाय पूर्णपणे कोरडे होऊन जातात. कोरडी झालेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी तुम्ही तयार केलेली क्रीम हात आणि पायांवर लावू शकता. यामुळे तुमच्या पायांवरील टॅन आणि कोरडेपणा निघून जाण्यास मदत होईल. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये मॉईश्चरायझर वापरणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा: थंडीमुळे ओठ फाटले आहेत? मग घरीच तयार करा लिपबाम, ओठ होतील मऊ गुलाबी
हळदीमध्ये असलेले अँटीऍक्सिडंट गुणधर्म त्वचेवरील काळेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचा मऊ करण्यासाठी मदत करते. हळद त्वचेसंबंधित अनेक समस्यांवर गुणकारी आहे. लिंबाच्या रसात असलेले अँटिऑक्सिडंट्स स्किनमधील कोलेजन वाढवण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या कमी होतात. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्याचे काम ऑलिव्ह ऑइल करते. लिंबाच्या रसाचा वापर त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो.