पिगमेंटेशन कमी करण्यासाठी घरगुती उपाय
वाढत्या वयानुसार त्वचेमध्ये अनेक बदल होण्यास सुरुवात होते. शरीरात सातत्याने होणारे हार्मोनल असंतुलन, चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या, बारीक रेषा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. फेशिअल करणे, तर कधी केमिकल ट्रीटमेंट करून घेणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र या सगळ्याचा परिणाम फारकाळ चेहऱ्यावर टिकून राहत नाही. चेहरा पुन्हा एकदा होता तसाच होऊन जातो. त्यामुळे त्वचेला पोषण देण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळीच्या 15 दिवस आधी सगळीकडे घराची साफसफाई, दिवाळीचा फराळ, दिवाळीची खरेदी इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात.सतत काम करत राहिल्यामुळे आणि अपुऱ्या झोपेमुळे त्वचेवर पिगमेंटेशन वाढण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल, पिगमेंटेशन, बारीक सुरकुत्या घालवण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दिवाळीआधी पिगमेंटेशन घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा उजळदार आणि सुंदर दिसेल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: अंघोळ केल्यानंतर किती वेळा फॉलो करावे स्किन केअर रुटीन? त्वचेची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स
वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मसूर डाळ आणि मुलतानी मातीचा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो टिकून राहील आणि त्वचा सुंदर आणि चमकदार दिसेल. तसेच उजळदार आणि सुंदर त्वचेसाठी शरीराला आतून पोषण मिळण्याची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे नेहमी पोषक आणि पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
हे देखील वाचा: दिवाळीमध्ये सुंदर त्वचा हवी असेल तर मुलतानी मातीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल सुंदर
फेसपॅक वाटीमध्ये 1 चमचा मसूर डाळीची पावडर घेऊन त्यात मुलतानी माती मिक्स करा. नंतर त्यात तांदुळाचे पीठ आणि थोडेसे पाणी टाकून जाडसर पेस्ट बनवा. तयार केलेले मिश्रण त्वचेवर व्यवस्थित लावून घ्या. 15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता.