स्किन केअरमध्ये कोणत्या गोष्टी वापराव्यात
दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने होण्यासाठी शरीर स्वच्छ असणे आवश्यक आहे. शरीर स्वच्छ असेल तर मन सुद्धा स्वच्छ आणि आनंदी राहते. यासाठी रात्री झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी सकाळी अंघोळ केली जाते. अंघोळ केल्यानंतर शरीर स्वच्छ होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. पण जे उपाय करण्याची खरंच आवश्यकता आहे, असे उपाय केले जात नाहीत. त्यातील महत्वाचा उपाय म्हणजे अंघोळ केल्यानंतर स्किन केअर फॉलो न करणे, स्किन केअर फॉली न केल्यामुळे त्वचा काळवंडलेली आणि खराब दिसू लागते. उन्हात बाहेर गेल्यानंतर त्वचेला सनस्क्रीन लावावे. मात्र अनेक महिला त्वचा चिकट आणि तेलकट होते म्हणून सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावणे टाळतात. पण असे केल्यामुळे त्वचेवर आणखीन पिंपल्स वाढण्याची शक्यता असते.
स्किन केअरमध्ये त्वचेला सूट होतील असे प्रॉडक्ट वापरल्यास त्वचा आणखीन सुंदर आणि चमकदार दिसते. त्यामुळे अंघोळ झाल्यानंतर चेला क्लिंझिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा हायड्रेट आणि निरोगी राहण्यास मदत होते. बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या स्किन प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी त्वचेला सूट होतील असेच प्रॉडक्ट त्वचेसाठी वापरावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अंघोळ केल्यानंतर त्वचा निरोगी आणि हायड्रेट आणि निरो ठेवण्यासाठी दिवसभरातून किती वेळा स्किन केअर रुटीन फॉलो करावे, याबद्दल सांगणार आहोत. स्किन केअर रुटीन योग्य पद्धतीने फॉलो केल्यास त्वचेवर फरक दिसून येतोच.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: दिवाळीमध्ये सुंदर त्वचा हवी असेल तर मुलतानी मातीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल सुंदर
शरीर आणि मन स्वच्छ करण्यासाठी अंघोळ केल्यानंतर स्किन केअर रुटीन नियमित फॉलो करावे. अंघोळ केल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी स्किन केअर रुटीन फॉलो करावे. कारण अंघोळ केल्यानंतर शरीराच्या तापमानात वाढ होते आणि शरीराला घाम येतो. घाम आल्यानंतर तुम्ही लावलेले प्रॉडक्ट निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अंघोळ करून आल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी स्किन केअर रुटीन फॉलो करावे. ज्यामुळे त्वचा सुंदर आणि निरोगी राहण्यास मदत होईल.
अंघोळ करताना त्वचा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश केला जातो. मात्र त्यानंतर घाम आल्यामुळे त्वचा तेलकट किंवा चिकट होऊन जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर क्लिन्झर लावून पुन्हा एकदा त्वचा स्वच्छ करावी. जेणेकरून तेलकट आणि चिकटपणा निघून जाण्यास मदत होईल. क्लिन्झर लावल्यानंतर त्वचा स्वच्छ करून काही वेळ थांबण्याची आवश्यकता नाही. तुम्ही लगेच दुसरी स्टेप फॉलो करू शकता.
त्वचेला सूट होईल असे सीरम त्वचेवर लावावे. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे विटामिन सी सीरमी उपलब्ध आहेत. त्यातील तुमच्या त्वचेला जे सूट होईल ते तुम्ही वापरू शकता.
हे देखील वाचा: स्किन केअरसाठी वरदान लिंबाचा काळा चहा
त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर त्वचेवर लावले जाते. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यास मदत होते. मॉइश्चरायझरलावून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिट थांबून मगच इतर प्रॉडक्ट त्वचेवर लावावे.
बाहेर जाताना किंवा घरी असल्यानंतर सुद्धा सनस्क्रीन लावावे. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. नियमित सनस्क्रीनलावल्यास त्वचेवरील टॅन कमी होऊन त्वचा सुंदर आणि उजळदार दिसेल.