सुंदर त्वचेसाठी मुलतानी मातीमध्ये मिक्स करा हे पदार्थ
मागील अनेक वर्षांपासून मुलतानी मातीचा वापर सुंदर आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी केला जात आहे. मुलतानी मातीमध्ये असलेले गुणधर्म त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. काळवंडलेली त्वचा उजळ्वण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. सर्वच महिला, मुलींना नेहमी असेच वाटते आपल्या चेहऱ्यावर एकही डाग नसावा. पण पचनक्रियेत होणाऱ्या बदलांमुळे, हार्मोनल असंतुलन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य बिघडून जाते. बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी आहारात बदल करून पौष्टिक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. जेणेकरून त्वचा निरोगी आणि चमकदार राहील.
अनेक महिला चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. कधी त्वचेवर फेसपॅक लावणे तर कधी त्वचेवर वेगवेगळ्या क्रीम्स लावल्या जातात. यामुळे त्वचा काहीकाळ सुंदर दिसते, मात्र पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. केमिकल उपाय करण्याऐवजी सुंदर त्वचा मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावे. यासाठी मुलतानी मातीचा वापर तुम्ही करु शकता. मुलतानी माती त्वचेला एक्सफोलिएट करते. तसेच चेहऱ्यावर साचून राहिलेली घाण, धूळ काढून टाकून त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते. लवकरच दिवाळी सण येणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळी सणात सुंदर आणि चमकदर त्वचेसाठी मुलतानी मातीमध्ये कोणते पदार्थ मिक्स करावे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सुंदर आणि मुलायम केसांसाठी घरीच तयार करा हेअर मास्क, केसांच्या समस्या होतील दूर
चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी वाटीमध्ये एक चमचा मुलतानी माती घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करा., जाडसर पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेला लावून काहीवेळ सुकण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाणी लावून त्वचा हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास त्वचा स्वच्छ होऊन त्वचेवरील घाण निघून जाईल. मुलतानी मातीचा वापर केल्यामुळे त्वचेवरील काळे डाग निघून जातात.
हे देखील वाचा: स्किन केअरसाठी वरदान लिंबाचा काळा चहा
वाटीमध्ये मुलतानी माती घेऊन त्यात मध टाकून मिक्स करा. नंतर संपूर्ण चेहऱ्याला तयार मिश्रण लावा. 15 ते 20 मिनिट ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवरील काळे डाग आणि टॅन झालेली त्वचा निघून जाण्यास मदत होईल. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास त्वचेवरील अनेक समस्या कमी होण्यास मदत होईल.