नाकावर आलेले ब्लॅकहेड्स काढण्यासाठी घरगुती उपाय
सुंदर दिसण्यासाठी सर्वच महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेशिअल करून घेणे तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. मात्र या ट्रीटमेंट करून सुद्धा त्वचेवर हवा तसं ग्लो येत नाही. त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण द्यावे. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक टिकून राहते आणि तुम्ही अधिक सुंदर दिसतात. बऱ्यादा नाकावर आलेले ब्लॅकहेड्स चेहऱ्याचे सौंदर्य कमी करून टाकतात. ब्लॅकहेड्स प्रामुख्याने नाक, हनुवटी आणि कपाळावर येतात. नाकावर आलेले ब्लॅकहेड्स काढण्यासाठी काही महिला क्लीनअप पिनचा वापर करतात, तर काही महिला केमिकल ट्रीटमेंट करून ब्लॅकहेड्स काढता.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
नाकावर आलेले ब्लॅकहेड्स काढण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करूनसुद्धा नाकावर आलेले ब्लॅकहेड्स काढू शकता. यामुळे तुमच्या त्वचेची छिद्र स्वच्छ होतील. धूळ, माती, प्रदूषणामुळे खराब झालेला चेहरा स्वच्छ राहील आणि त्वचा चमकदार आणि सुंदर दिसेल. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट किंवा प्रॉडक्ट लावण्याऐवजी घरगुती उपाय करावे, यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि त्वचेला अनेक फायदे होतात.
ब्लॅकहेड्स काढण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात दही मिक्स करून जाडसर पेस्ट तयार करा. दह्याच्या मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार केल्यानंतर नाकावर आलेल्या ब्लॅकहेड्सना पेस्ट लावून हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिटं हलक्या हाताने मसाज केल्यानंतर नाकावरील पेस्ट कापडाच्या सहाय्याने पुसून घ्या.त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
त्वचेसंबंधित सर्वच समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जातो. कोरफड जेल त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात कोरफड जेल मिक्स करून जाडसर पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे तुमची त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी तुम्ही साखरेचे वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात साखर टाकून मिक्स करा. नंतर त्यात मध आणि बेसन टाकून पेस्ट बनवून घ्या. तयार केलेली पेस्ट नाकावर आणि ब्लॅकहेड्स आलेल्या ठिकाणी लावून ५ मिनिटं ठेवून नंतर हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज करून झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकदार होईल. त्वचेसाठी तांदळाचे पीठ अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय यामुळे त्वचाबी उजळण्यास मदत होते.