दातांवरील पिवळा थर घालवण्यासाठी घरगुती उपाय
जेवल्यानंतर किंवा इतर वेळी काही खाल्ल्यानंतर दात व्यवस्थित स्वच्छ केले नाहीतर दातांवर पिवळा थर साचण्यास सुरुवात होते. दातांवर तयार झालेला पिवळा थर कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण हा पिवळा थर दातांवर साचल्यानंतर हिरड्या अस्वच्छ दिसू लागतात. दात पिवळे झाल्यानंतर हसताना किंवा इतर वेळी दात पिवळे दिसल्यानंतर चारचौघांमध्ये जाण्यास लाज वाटू लागते. दातांचा पिवळा थर साफ करण्यासाठी अनेक लोक बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या टूथपेस्ट किंवा मशेरी लावतात. पण या सर्व गोष्टींमुळे काहीवेळ दात स्वच्छ दिसतात. पण पुन्हा एकदा दात होते तसेच होऊन जातात. दातांवर पिवळा थर वाढल्यानंतर तोंडाला वाफ येऊ लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पिवळ्या दातांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे तुमचे दात पांढरे शुभ्र दिसू लागतील.
हे देखील वाचा: चहाने अॅसिडिटी होते का? मग चहा पिण्याआधी आणि चहा प्यायल्यानंतर करा ‘हे’ सोपे उपाय
हे देखील वाचा: आंब्याला फळांचा राजा, तर ‘या’ फळाला म्हटलं जात राणी
त्रिफळामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे दात स्वच्छ होऊन तोंडामधील वास निघून जाईल.त्रिफळामध्ये असलेले गुणधर्म दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. दात स्वच्छ करण्यासाठी लवंग वापरल्यामुळे पोकळी, दातदुखी, दात किडणे, श्वासाची दुर्गंधी यांच्याशी लढण्यास मदत होते. तसेच दातांच्या सर्व समस्या कमी होतील. बॅक्टिरियामुळे खराब झालेले दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट म्हणून त्रिफळा आणि लवंग पावडरचा वापर करा.