चहा पिण्याआधी आणि चहा प्यायल्यानंतर करा 'हे' सोपे उपाय
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या संख्येने चहा प्रेमी आहेत. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते, तर काहींना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा प्यावा लागतो. कामाच्या तणावातून शरीराला विश्रांती देण्यासाठी अनेक लोक चहा पितात. अनेकदा बाहेर कुठे गेल्यानंतर सगळ्यात आधी चहा प्यायल्या जातो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सार्वधिक चहा प्यायला जातो. हर्बल टी, ग्रीन टी, दुधाचा चहा, काळा चहा इत्यादी अनेक चहाचे प्रकार आहेत. पण चहाचे अतिसेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
जास्त प्रमाणात चहाचे सेवन केल्यामुळे पोटात जळजळ, गॅस आणि अस्वस्थता इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात चहाचे सेवन करावे. काहींना दिवसभरातून 5 ते 6 वेळा चहा पिण्याची सवय असते. पण सतत चहा प्यायल्यामुळे पोटात मोठ्यावर अॅसिडिटी निर्माण होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चहा पिण्याआधी आणि चहा प्यायल्यानंतर अॅसिडिटी होऊ नये, म्हणून कोणते उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘या’ हिरव्या पानांचे सेवन, युरिक ॲसिड होईल क्षणात कमी
चहा पिण्याआधी अर्धा ग्लास पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होत नाही. कारण पाण्यासोबत लाळ पोटामध्ये जाते. पोटात लाळ गेल्यानंतर लिव्हरमधील विषारी घटक बाहेर पडून जातात. यामुळे अॅसिडिटीचा त्रास होत नाही.
नारळाच्या तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. नारळाच्या तेलात अॅसिडिटी कमी करणारे गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे चहा पिण्याआधी एक थेंब नारळाचे तेल तोंडात टाका. त्यानंतर गुळण्या करून थुकून टाका. असे केल्यामुळे अॅसिडिटी कमी होऊन आराम मिळतो. नारळाच्या तेलात असलेले नैसर्गिक अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म अॅसिडिटी कमी करण्यासाठी मदत करतात.
हे देखील वाचा: शरीराच्या नसानसात भरेल ताकद,रोजच्या आहारात करा ‘या’ ड्रायफ्रुटचा समावेश
अनेक लोक चहा बनवताना भरपूर आल्याचा वापर करतात. यामुळे चहा तिखट होते. तिखट चहा प्यायल्यामुळे अॅसिडिटी किंवा जळजळ होऊन आरोग्य बिघडून जाते.त्यामुळे चहामध्ये कमीत कमी आल्याचा वापर करावा. अॅसिडिटीचा त्रास जाणवू लागल्यानंतर कच्च्या आल्याचा तुकडा घेऊन चघळत राहावा. यामुळे पोटातील जळजळ कमी होते.