
जेव्हा तुम्ही हॉटेल मध्ये जाता तेव्हा तुम्ही हॉटेल मध्ये टिप देता ते ही सह खुशीने, तर एखादा श्रीमंत माणूसला किती टिप देत असेल सांगा पाहू? १०००, ५००० यापेक्षा जास्त तर देणार नाही ना? पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या महिला वेटरला जवळजवळ २ लाख रुपये टिप म्हणून मिळाले आहेत.
यावर विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे. मारियाना लॅम्बर्ट अमेरिकेतील अल्फ्रेडो पिझ्झा कॅफेमध्ये काम करते. जे सर्वसामान्य वेटर काम करतात, तेच काम ही महिला करते. लोकांना जेवण देणं आणि नंतर त्यांना बिल देणं हे तिचे काम. पण तिच्या आयुष्यात असं काही घडलं ज्याने तिचं नशीब चमकलं आहे.
या कॅफेमध्ये एका व्यक्तीने येऊन एक हजार रुपयांचं खाणं खाल्लं. आणि ते खाणं खाल्याच्या नंतर तिला २ लाख मिळाले. जेव्हा मारियानाने बिल आणलं तेव्हा तिला मिळालेली टिप पाहून तिच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. या माणसाने तिला २ लाख ३९ हजार रुपये टिप म्हणून दिले. हा आहे वेटर असल्याचा महत्वपूर्ण फायदा.