फोटो सौजन्य: Freepik
आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या शरीराचे वजन मेंटेन ठेवणे हे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे हे . मात्र, अनेकांना याची काळजी घेता येत नाही. विशेषतः भारतात तेलकट आणि गोड पदार्थ खाण्याचा ट्रेंड खूप जास्त असल्यामुळे अनेकांच्या पोटाची आणि कंबरेची चरबी वाढू लागते. याचसोबत त्यांचे वजनही वाढते.
अशा परिस्थितीत तुम्ही थोडे सावध राहावे अन्यथा त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्हाला माहित आहे का मुलगा आणि मुलीच्या कंबरेचा आकार किती असावा की जेणेकरून त्यांना अनेक रोगांचा धोका जाणवणार नाही? याबाबत न्यूट्रिशनिस्ट काय म्हणाल्या ते पाहूया.
केवळ तुमचे शरीराचे वजन हे तुमच्या एकूण आरोग्याचे किंवा रोगांच्या धोक्याचे मोजमाप नाही. कंबरेचे मोजमाप तुमच्या लठ्ठपणाबद्दल देखील सांगते जे रोगाचा धोका दर्शविण्यास मदत करते. पोटाच्या आतल्या भागात अतिरिक्त चरबी जमा होते, ज्याला व्हिसेरल फॅट (Visceral Fat) म्हणतात. ही चरबी रोगांना आमंत्रण देते. जेव्हा तुमच्या कंबरेचा आकार वाढत असतो, तेव्हा याचा अर्थ व्हिसरल फॅटचे प्रमाण वाढत आहे. हे म्हणणे न्यूट्रिशनिस्टचे आहे.
पुरुषांसाठी त्यांच्या कंबरेचा आकार 94 सेंटीमीटर किंवा 37 इंचापेक्षा कमी असला पाहिजे, तर महिलांच्या कंबरेचा आकार 80 सेंटीमीटर किंवा 31.5 इंचांपेक्षा कमी असावा. या आकारानं फॉलो केल्यास अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
महत्वाची सूचना: प्रिया वाचक जर तुम्ही तुमच्या आरोग्याशी निगडित काहीही वाचले असेल तर त्याचा अवलंब करण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.