Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आईबाबा होऊ शकत नाही…’, वाढती व्यसनाधीनता, बदलती जीवनशैली कारणीभूत; ‘IVF’ उपचारातून वंध्यत्वावर मात शक्य

सध्या अनेक जोडप्यांना आईवडील न होण्याची समस्या उद्भवते आहे. पण यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी नक्की काय करावे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार IVF उपायातून वंध्यत्वावर मात करणे सोपं आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 24, 2025 | 02:09 PM
वंधत्वावर मात करता येते का आणि असेल तर काय आहे उपाय (फोटो सौजन्य - iStock)

वंधत्वावर मात करता येते का आणि असेल तर काय आहे उपाय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या जोडप्यांमध्ये वंध्यत्व ही मोठी समस्या आहे. चुकीची लाइफस्टाइल आणि अवेळी खाणे, झोपणे या सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा भाग हा अनेक आजारांना कारणीभूत ठरतोय. भारतात १५ ते २० टक्के दाम्पत्य अपत्यसुखापासून वंचित राहत असून, योग्य मार्गदर्शन आणि  आयव्हीएफ उपचारातून यावर सहज मात करणे शक्य असल्याची माहिती ज्येष्ठ स्रीरोग तज्ज्ञ बिर्ला आयव्हीएफचे सेंटर डॉ. प्रमोद येरणे यांनी दिली.   

वंध्यत्वाच्या वाढत्या समस्येबद्दल बोलताना डॉ. येरणे म्हणाले, आजची तरुण पिढी खूप जास्त करिअरिस्टिक आहे. पॅकेजसच्या मागे धावत असताना लग्नाचे वय कधी उलटून जाते हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. योसाबत बदलती लाइफस्टाइल, तरुण मुलींमध्ये वाढती व्यसनाधीनता ही वंध्यत्वाची प्रमुख कारणे असून, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात ही समस्या अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे डॉ. येरणे यांनी नमूद केले.

अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न  

बिर्ला आयव्हीएफ सेंटरच्या माध्यमातून महिलांच्या जनजागृतीसाठी ठिकठिकाणी निःशुल्क शिबिरांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून महिलांना योग्‍य माहिती देऊन, आयव्हीएफ उपचारातून अपत्यप्राप्ती होऊ शकते हा विश्वास त्यांना दिला जातो. नागपूर, हिंगणघाट, बालाघाट, वरुड अशा अनेक ठिकाणी नियमित शिबिरांचे आयोजन केले जाते. आययूआई, आयव्हीएफ या तंत्रज्ञानातून निपुत्रिकांना मातृत्वसुख मिळवून देता येते. लग्नानंतर दोन वर्षे बाळ न झाल्यास तत्काळ आयव्हीएफ सेंटरमध्ये यावे. बरेच जण अनेक वर्षे प्रसूतीतज्ज्ञांकडे उपचार करून चाळीशी लोटल्यानंतर सेंटरमध्ये येत असल्याचे डॉ. येरणे यांनी सांगितले.

व्यसनमुक्ती हाच उपाय 

वंध्यत्वासाठी महिला ४५ टक्के तर पुरुष ४० टक्के जबाबदार आहेत. महिला आणि पुरुषांमध्ये वाढती व्यसनाधीनता हेच याचे मुख्य कारण आहे. पूर्वी व्यसनाधीनता केवळ पुरुषांमध्ये असायची. ग्रामीण भागात तंबाखूचे सेवन करणाऱ्या महिला आढळायच्या. परंतु आता शहरी भागात सर्रास तरुणी धूम्रपान करताना दिसतात. याचा थेट परिणाम महिलांच्या अपत्यप्राप्तीवर होतो. यासोबतच वाढत्या तणावामुळे समस्या वाढत असल्याचे डॉ. येरणे यांनी सांगितले. 

इंग्लंड क्रिकेटर Danielle Wyatt ने शेअर केली Good News! Lesbian मुली कशा होतात आई, काय आहे प्रक्रिया

अतिशय सुरक्षित उपचार पद्धती 

एखाद्या दाम्पत्याला वर्ष-दोन वर्षांपासून अपत्य नसल्यास त्यांनी वंध्यत्वाची तपासणी नक्की करावी. सुरुवातीला रक्ततपासणी आणि इतर तपासणी करून पुढील उपचारांची दिशा ठरवली जाते. बदलत्या काळानुसार अतिशय चांगल्या दर्जाचे आणि सुरक्षित इंजेक्शन तसेच इतर सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असे कपल्स असतील जे अपत्यसुखापासून वंचित आहेत त्यांना नक्कीच आयव्हीएफचा सल्ला द्यावा.  यात कुठलाही धोका नाही. ज्या दाम्पत्यांना दोन-तीन वेळा आयव्हीएफमध्ये यश आले नाही त्यांनाच पुढे सरोगसीचा पर्याय सांगितला जातो. विशेष म्हणजे यासाठी तज्ज्ञ समुपदेशक, मार्गदर्शक आणि ज्यांची आर्थिक स्थिती बरी नाही अशांसाठी शून्य टक्के व्याजदरावर  कर्ज सुविधा उपलब्ध असल्याचे आयव्हीएफ तज्ज्ञ डाॅ. प्रमोद येरणे यांनी सांगितले.  

भीती, दडपण, तणाव आणि व्यसनाधीनता ही वाढत्या वंध्यत्वाची कारणे आहेत. आनंदी आणि व्यसनमुक्त जीवनशैली उत्तम आरोग्याचे गमक आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात वंध्यत्वाची समस्या मोठी आहे. निपुत्रिक जोडप्यांसाठी मोफत शिबिरांचे आयोजन केले जाते. योग्य वयात उपचार घेऊन अपत्यसुखाचा आनंद घ्यावा, असेही डॉ. प्रमोद येरणे म्‍हणाले.

वयाच्या 70 व्या वर्षी महिलेने IVF द्वारे दिला बाळाला जन्म, वाढत्या वयात आयव्हीएफ ट्रीटमेंट यशस्वी ठरते का?

Web Title: How to conceive baby instead of infertility ivf is the best option for couples as per expert dr pramod yerne

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • IVF
  • pregnancy
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

गर्भावस्थेत वाढतोय उच्च रक्तदाब धोका! ‘कामा आणि ऑलब्लेस’मधील अभ्यासात करण्यात आला धक्कादायक खुलासा
1

गर्भावस्थेत वाढतोय उच्च रक्तदाब धोका! ‘कामा आणि ऑलब्लेस’मधील अभ्यासात करण्यात आला धक्कादायक खुलासा

‘गरोदर न राहण्यासाठी Contraceptive Pill घेतली, मी आई नाही का होऊ शकणार?’, मुलीच्या प्रश्नावर डॉक्टरांनी सांगितले सत्य
2

‘गरोदर न राहण्यासाठी Contraceptive Pill घेतली, मी आई नाही का होऊ शकणार?’, मुलीच्या प्रश्नावर डॉक्टरांनी सांगितले सत्य

‘3 वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करतोय पण…’, डॉक्टरही कारण शोधण्यास अयशस्वी, 1 टेस्टमधून कळले बायकोसंबंधित रहस्य
3

‘3 वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करतोय पण…’, डॉक्टरही कारण शोधण्यास अयशस्वी, 1 टेस्टमधून कळले बायकोसंबंधित रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.