नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत अनेक कीटक आणि जीवजंतूंचा धोका असतो. आद्रता वाढली घराच्या कानाकोपऱ्यात झुरळांची संख्या वाढते. विशेषतः किचनच्या सिंकमध्ये आणि बाथरूममध्ये त्यांची संख्या वेगाने वाढू लागते. एवढेच काय तर आता सरडेही जमिनीवर तसेच भिंतीवर रेंगाळताना दिसतात. अशीच परिस्थिती तुमच्याही घरात रोज होत असेल तर तुम्ही यावर एक साधा आणि कायमस्वरूपी उपाय करू शकता. यासाठी जेव्हाही तुम्ही तुमचे घर आणि स्वयंपाकघर स्वछ कराल तेव्हा त्या पाण्यात काही गोष्टी घालायला विसरू नका. याच्या मदतीने तुमच्या घरातील झुरळे, पाली आणि इतर कीटक दूर राहण्यास मदत होईल.
थंड पाणी
पालीचे रक्त थंड असते आणि उष्णता मिळवण्यासाठी तिला उष्ण वातावरणातील उष्णता घ्यावी लागते. अशा परिस्थितीत, थंडीच्या हंगामात कमी तापमानामुळे ते बाहेर पडत नाहीत. त्यामुळे तुमच्या घरात कधी सरडा किंवा पाली आल्या तर त्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता.
लिंबू आणि मिठाचा करा वापर
एमओपीच्या पाण्यात चार ते पाच चमचे मीठ घालून त्यात दोन लिंबू पिळून नजीत मिक्स करा. आता हे पाणी लादी किंवा किचनकट्टा साफ करण्यासाठी वापरा. याचा वापर तुम्ही लादीवर, भिंतीवर आणि फर्निचर साफ करण्यासाठी करू शकता. यामुळे तुमची फारशी चमकदारच नाही होणार तर तुम्हाला झुरळांपासूनही सुटका मिळेल.
लसूण आणि कांदा
असे म्हणतात की, स्वयंपाक घरात ठेवलेले कांदे आणि लसणाच्या पाकळ्या खिडकीत किंवा दारात टांगल्यास पाली घरात प्रवेश करत नाहीत. याचे कारण म्हणजे पालींना लसणाचा आणि कांद्याचा वास अजिबात आवडत नाही.
कापूर आणि लवंग
यासाठी एक कप पाण्यात 5 ते 6 कपूर घेऊन त्यांची पावडर करून टाका आणि मग त्यात लवंग तेल टाका आणि मिक्स करा. आता हे द्रावण पाण्यात मिसळा आणि लादी पुसा. यांचा तीव्र वास झुरळे, कीटक आणि सरडे यांना दूर ठेवण्यास मदत करेल.