घरातल्या कुंडीत कसे लावावे आले (फोटो सौजन्य - iStock)
प्रत्येक घरात आल्याचा वापर केला जातो. विशेषतः पावसाळ्यात गरमागरम आल्याचा चहा हा तर चहा प्रेमींसाठी पर्वणीच असते. बाहेर सुखद गारवा, पाऊस आणि हातात आल्याच्या चहाचा कप, वाचल्यानंतरही तुम्हाला नक्कीच मनात सुख जाणवले असेल ना? खरं आहे. आल्याचा सर्रास वापर आपण करतो. पण नेहमी बाजारातून आलं आणून.
आता तुम्ही ताजं आलं घरीच तयार करू शकता. आल्याचं रोप कसं तयार करावं आणि कशा पद्धतीने त्याची देखभाल करावी याच्या सोप्या गार्डनिंग टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. आले थेट घरच्या बागेत लावता येते किंवा कुंडीतही वाढवता येते. एकूणच, आल्याची लागवड अगदी कमी जागेत करता येते. अद्रक लागवडीची पद्धत जाणून घेऊया. सांताक्रुझ कलिना येथील नर्सरीचे मालक संतोष मयेकर यांनी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत, जाणून घ्या.
घरी आले कसे वाढवायचे?
घरी आले वाढवण्यासाठी 2-3 डोळे असलेला अर्थात कोंब आलेला २-३ इंचाचा तुकडा निवडा. चांगला निचरा होणारी, सैल आणि सुपीक माती वापरा. तुम्ही मातीत घरगुती खत किंवा गांडूळ खतदेखील घालू शकता. आता 10-12 इंच खोल आणि 8-10 इंच रुंद भांडे निवडा. आल्याचा तुकडा 24 तास पाण्यात भिजत ठेवा.
कशी भिजवावी माती?
घरी कसे वाढवावे आले (फोटो सौजन्य – iStock)
पाणी कसे द्यावे?
आल्याची लागवड (फोटो सौजन्य – iStock)
तुम्हाला याची पूर्ण माहिती नसेल तर तुम्ही एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे घरातील गार्डनमध्ये आल्याची लागवड करा.