नैसगरिक गोडवा असलेले मध (Honey) लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मधात आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. उचकी लागल्यानंतर किंवा तोंडाची बिघडलेली चव पुन्हा मिळवण्यासाठी मधाचा वापर केला जातो. यामध्ये असलेले विटामिन्स आणि मिनरल्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. वजन कमी करण्यासाठी ते त्वचेचे आरोग्य सुधारण्यापर्यंत सगळ्याचं ठिकाणी मधाचा वापर केला जातो. मधामध्ये फायबर आणि प्रथिने जास्त असल्याने शरीराचे होणारे नुकसान टाळता येते. संसर्गजन्य आजारांपासून शरीराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मध गुणकारी आहे. आज आम्ही तुम्हाला मध खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात? मधात कोणते पदार्थ मिक्स करून खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य- Istock)
रोजच्या आहारात मधाचे सेवन कसे करायचे:
मध आणि दालचिनी:
भारतीय मसाल्यांमध्ये दालचिनीचा वापर केला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. दालचिनी आणि मधाचे मिश्रण खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे मिश्रण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होऊन शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. मध दालचिनीचे मिश्रण खाल्ल्याने हृदय निरोगी आणि पचनक्रिया मजबूत राहते. हे मिश्रण आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा खाऊ शकता.
[read_also content=”आरोग्यासंबंधित ‘ही’ लक्षणे जाणवू लागल्यास लगेच करा मधुमेहाची तपासणी https://www.navarashtra.com/lifestyle/what-are-the-symptoms-of-diabetes-543601.html”]
मध आणि लिंबू:
मधासोबतच लिंबामध्ये अनेक गुणधर्म आढळतात. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लिंबू आणि मधाचे पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे पाणी उपुयक्त आहे. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिक्स केल्याने अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. तसेच शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
[read_also content=”शेवग्याच्या शेंगाचे फायदे, हिमोग्लोबिनपासून केसगळतीपर्यंत ठरतील वरदान https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-of-eating-drumstick-in-daily-diet-543569.html”]
ओट्स आणि मध:
वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स मध टाकून खाल्ले जातात. फायबरने समृद्ध असलेले ओट्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने ते शरीराला दिवसभर सक्रिय आणि फ्रेश राहण्यास मदत करतात. शरीराचे संसर्गापासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.