कोणतेही जोडीदार जेव्हा प्रेमात असतात तेव्हा सुरूवातीला सर्वच छान असतं. पण कालांतराने अनेक इश्यू निर्माण होऊ लागतात आणि काही कपल्समध्ये वाद विकोपाला जातात. अनेकदा गाडी ब्रेकअप अथवा घटस्फोटापर्यंत येऊन थांबते. पण जरा थांबा आणि विचार करा. प्रत्येक वेळी परिस्थितीच कारणीभूत असते असं नाही तर तुमच्या दोघांमधील संवाद होत नसतो अथवा एकमेकांना वेळ न देण्यानेही ही परिस्थिती उद्भवू शकते.
जेव्हा नातं ब्रेकअपच्या वळणावर असेल तेव्हा आपण ज्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करतोय त्यासाठी एकदा हा विचार करा अथवा यातील काही गोष्टी करून पाहा. नक्कीच तुम्हाला वेगळा अनुभव येऊन तुमचं नातं वाचू शकतं. (फोटो सौजन्य – iStock)
वेळ द्या
सर्वाधिक भांडणं ही एकमेकांना वेळ न दिल्यामुळेच होतात. पण वेळ देणं म्हणजे नक्की काय? तुम्ही दिवसभरातून आपल्या जोडीदारासाठी किमान १५ मिनिट्स काढून त्यांच्याशी प्रेमानं बोलणं हे तुमच्या बुडत्या नात्याची नाव नक्कीच वाचवू शकते. दिवसभरात काय ताण होता, दिवस कसा गेला अथवा तुमच्या नावडत्या व्यक्तीचे गॉसिपिंग का असेना पण किमान तितका वेळ एकमेकांना देत बोला. जेव्हा जेव्हा भेटाल इतर गोष्टी करण्यापेक्षा एकमेकांशी बोला.
यामुळे तुम्ही पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात आहात याची जाणीव होईल. दिवसभराचा तणाव कमी होईल आणि वेळ देत नाही ही तक्रारही दूर होईल.
[read_also content=”ब्रेडक्रंबिंग ट्रेंड म्हणजे नक्की काय? नात्यात काय आहे महत्त्वाचे https://www.navarashtra.com/lifestyle/what-is-toxic-dating-trend-breadcrumbing-know-the-signs-hows-to-handle-it-538924/”]
संवाद साधा
केवळ भेटल्यानंतर एक जण फोनमध्ये आणि एक जण कामात असं न करता एकमेकांशी संवाद साधा. जो काही अर्धा – १ तास भेटणार असाल त्याचा पुरेपूर वापर करा. यामुळे आपल्याकडे जोडीदाराचं व्यवस्थित लक्ष आहे याची जाणीव एकमेकांना राहाते. सतत कामाची कारणं देण्यापेक्षा जो काही वेळ मिळाला आहे तो एकमेकांबरोबर मजेत घालवल्यास तक्रारी वाढणार नाहीत आणि पुढच्या भेटीची ओढ राहील.
स्पर्श महत्त्वाचा
दोन व्यक्ती जेव्हा प्रेम करतात तेव्हा त्यात स्पर्शाने प्रेमाची जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे. एकमेकांचा हात हातात घेऊन बसणं असो अथवा खांद्यावर मान ठेऊन बसणं असो हे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी शब्दांचीही गरज भासत नाही. कारण त्या एका स्पर्शाने आपल्या माणसाची जवळीक, आपुलकी, प्रेम याची जाणीव आपोआप होत असते. अनेक ताण यामुळे सहज कमी होतात.
[read_also content=”पतीसोबत झालंय कडाक्याचं भांडण तर टाळा या गोष्टी https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-have-a-bitter-quarrel-with-your-husband-do-not-do-such-things-at-all-it-will-lead-to-disputes-nrsk-535811/”]
आठवड्यातून एकदा भेटाच
कितीही कामात असलात तरीही आठवड्यातून आपल्या माणसासाठी वेळ काढणं गरजेचे आहे. तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुमची वाट पाहत असते ही जाणीव ठेवा. इतर दिवशी काम, अन्य गोष्टींना प्राधान्य देत असाल तर एक दिवस तरी तुमच्या व्यक्तीसाठी जपून ठेवा. त्यावेळी कोणत्याही गोष्टींचा विचार न करता केवळ स्वतःविषयी आणि जोडीदाराविषयी विचार करा. एकमेकांना आवडणाऱ्या गोष्टी करा, फिरा, आवडीचे खा, चित्रपट पाहा अगदीच काही जमत नसेल तर किमान लाँग ड्राईव्हवर जा.
व्यक्त व्हा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आपल्या जोडीदाराला मिळविण्यासाठी सुरूवातील जे कष्ट घेतले होते तेच कष्ट नातं टिकविण्यासाठीही करा. म्हणजे नेमके काय? तर व्यक्त व्हा. तो वा ती कशी दिसत आहे? हे त्यांना सांगा. त्यांच्या सौंदर्याची स्तुती करा. त्यांनी घातलेल्या कपड्यांबाबत विचारा. त्यांच्या बारीक सारीक गोष्टीतील बदल जाणून घ्या आणि त्यांना ते सांगा. प्रेम नुसतं असून चालत नाही तर ते व्यक्त करणंही तितकंच गरजेचे आहे.
तुमच्या मनात ब्रेकअपचा विचार आला असेल अथवा तुमचं नातं तुटण्याच्या मार्गावर असेल तर यापैकी सर्व गोष्टी करून पाहा, नक्कीच तुमचा पुढचा नात्याच प्रवास सकारात्मकतेकडे जाईल.