

Beetroot Paratha: लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत कायमच चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. घरातील तेच ठराविक पदार्थ खाऊन मुलांना कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर विकतचे पदार्थ मागितले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे मुलांच्या शरीराची वाढ थांबते आणि शरीरात चरबीचा अनावश्यक घेर तयार होतो. त्यामुळे आहारात किंवा सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचा समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीट पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला बीट पराठा घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागते. चला तर जाणून घेऊया बीट पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.
बीट
गव्हाचं पीठ
आलं लसूण मिरची पेस्ट
जिऱ्याची पावडर
ओवा
हळद
मीठ
कोथिंबीर
तूप
पाणी
बीट पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बीटचे तुकडे घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नये.
मोठ्या ताटात गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, बीटची पेस्ट, आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर, ओवा, हळद घाला आणि मिक्स करून घ्या.
तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर गोळा तयार करा.
तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे पराठे लाटून गरम तव्यावर दोन्ही बाजूने भाजा आणि बाजूने तूप सोडून कुरकुरीत करा.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बीट पराठा. हा पदार्थ दह्यासोबत किंवा चटणीसोबत मस्त लागतो.