नवरात्रीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी
नवरात्री उत्सवाला राज्यभरात सगळीकडे सुरुवात झाली आहे. आज नवरात्री उत्सवाचा चौथा दिवस आहे. या दिवसांमध्ये अनेक महिला पुरुष उपवास करतात. उपवासाच्या दिवसांमध्ये साबुदाणा खिचडी, वडे, बटाट्याची भाजी, रताळे इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. पण हे पदार्थ रिकाम्या पोटी खाल्यामुळे काहीवेळा अपचन किंवा असिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये पचनास हलके आणि रोग्याला पौष्टिक ठरतील अशा पदार्थांचे सेवन करावे. काहींना उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण उपवास केल्यानंतर हलके फुलके पदार्थ खावेत. नवरात्रीच्या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी ताक, दूध, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवसांमध्ये नाश्त्यासाठी हेल्दी टेस्टी स्मूदी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: रोज सकाळी 2 भिजवलेले खजूर खा, फायदेच फायदे