सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट रताळ्याचा किस
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचा चविष्ट किस बनवू शकता. रताळ्याचा किस बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य आणि वेळ लागतो. याशिवाय रताळ खाणं आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणधर्मांमुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. दैनंदिन आहारात नियमित रताळ्याचे सेवन केल्यास वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. रताळ खाल्यानंतर लवकर भूक लागत नाही. दीर्घकाळ पोट भरलेले राहते. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित रताळ्याचे सेवन करावे. रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. सकाळच्या नाश्त्यात फायबरने समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया रताळ्याचा किस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नाश्त्यामध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचे Creamy Veg Sandwich, नोट करून घ्या सोपा पदार्थ
वाटीभर नाचणीच्या पिठाच्या वापर करून बनवा चविष्ट केक, वाढलेले वजन राहील नियंत्रणात