वाटीभर नाचणीच्या पिठाच्या वापर करून बनवा चविष्ट केक
गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वजन वाढते? असा अनेकांना वाटते. मात्र दैनंदिन आहारात चुकीच्या पदार्थांच्या कोणत्याही वेळ सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यामुळे योग्य वेळी शरीराला पचन होतील अशाच पदार्थांचे सेवन करावे. अनेक लोक वजन वाढेल म्हणून आहारातून गोड पदार्थ वजा करतात. मिठाई किंवा केक अशा कोणत्याच पदार्थांचे सेवन केले जात नाही. मात्र केक खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि फायद्याचे आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणीच्या केकचे सेवन केल्यास वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – iStock)
कांदापोहे खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा पोह्याचे कटलेट, वाचा सोपी रेसिपी
नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. फायबर युक्त अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, अमिनो आम्ल इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात नाचणीच्या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे ठरेल. चला तर जाणून घेऊया नाचणीचा केक बनवण्याची सोपी कृती.
Valentine Day करा खास, जोडीदाराकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी बनवा ‘हार्ट शेप पिझ्झा’