Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकाच ग्रॅव्हीपासून बनवता येतील अनेक पदार्थ, रोजच्या जेवणात करा समावेश, वाचा रेसिपी

घरात बनवायला तासनतास लागणार पदार्थ रेस्टॉरंटमध्ये काही मिनिटांतच कसा तयार होतो. खरं तर रेस्टॉरंटमध्ये भाज्यांची ग्रेव्ही आधीच बनवून ठेवली जाते. तुम्हालाही झटपट भाज्या तयार करायच्या असतील तर ही ग्रेव्ही घरात बनवून पहा. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 08, 2024 | 02:03 PM
एकाच ग्रॅव्हीपासून बनवता येतील अनेक पदार्थ, रोजच्या जेवणात करा समावेश, वाचा रेसिपी
Follow Us
Close
Follow Us:

रेस्टॉरंटचे चवदार जेवण अनेकदा खाण्याची इच्छा होत असते. घरातल्या जेवणाचा कंटाळा आला की, काही तरी नवीन म्हणून आपण रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी जात असतो. प्रत्येक भाजीची चव लपलेली असते तिच्या ग्रेव्हीत. तुमची ग्रेव्ही जितकी स्वादिष्ट असेल तितकाच तुमचा पदार्थ रुचकर बनतो. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर अगदी क्षणार्धात आपल्यासमोर जेवण सर्व्ह केले जाते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्या जेवणाला बनवायला घरी तासनतास लागतात तेच जेवण रेस्टॉरंटमध्ये काही मिनिटांतच कसे तयार होते. यामागचे खरे कारण आहे त्यांची ग्रेव्ही.

रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचदा भाज्यांची ग्रेव्ही आधीच बनवून ठेवली जाते. ही ग्रेव्ही अनेक भाज्यांमध्ये वापरता येते. तुम्हालाही अशी रेस्टॉरंट स्टाइल ग्रेव्ही बनवायची असेल तर ही रेसिपी जरूर वाचा आणि घरी ट्राय करा. या ग्रॅव्हीने तुमचे जेवण अगदी कमी वेळेत बनून तयार होईल. तसेच या ग्रेव्हीला तुम्ही काही दिवस स्टोर करूनही ठेवू शकता.

[read_also content=”तांदळाच्या पिठापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवा इन्स्टंट कुरकुरीत डोसा https://www.navarashtra.com/lifestyle/instant-easy-and-tasty-wheat-dosa-recipe-544311.html”]

साहित्य

  • 4 मोठे कांदे
  • 5-6 मोठे लाल टोमॅटो
  • 2 इंच आले
  • 6-7 हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • अर्धा टीस्पून लाल तिखट
  • अर्धा टीस्पून हळद
  • अर्धा टीस्पून गरम मसाला
  • अर्धा टीस्पून जिरे पावडर
  • एक चिमूटभर हिंग
  • 1 टीस्पून ओवा
  • 1 टेबलस्पून धने
  • 1 टीस्पून जिरे
  • 2 दालचिनीच्या काड्या
  • 2-3 तमालपत्र
  • 5-6 हिरव्या वेलची
  • 7-8 लवंग
  • 12-15 काजू
  • 1 टीस्पून मीठ
  • अर्धा कप तेल
कृती
  • रेस्टॉरंट स्टाइल ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा सोलून बारीक चिरून घ्या. आता एका कढईत तेल गरम करून यात चिरलेला कांदा टाका
  • कांदा थोडा परतून घ्या मग यात काजू आणि धने घाला
  • नंतर यात टोमॅटो आणि मीठ घाला आणि काही मिनिटे याला चांगले शिजू द्या
  • त्यानंतर यात हिरवी मिरची आणि आलं घाला
  • आता यात शेवटी कोथिंबीर घाला आणि सर्व साहित्य नीट एकजीव करून शिजू द्या
  • हे सर्व साहित्य हलके परतून घेतल्यानंतर गॅस बंद करा आणि हे साहित्य थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये याची एक पेस्ट तयार करा
  • आता गॅसवर दुसरी कढई ठेवा, यात तेल टाका
  • तेल गरम झाले की यात २ दालचिनीच्या काड्या, २-३ तमालपत्र, ५-६ हिरव्या वेलची आणि ७-८ लवंगा घाला. नंतर यात सर्व मसाले आणि पाणी घाला
  • मसाले काही मिनिटे शिजल्यानंतर यात तयार पेस्ट टाका आणि मंद आचेवर ५ ते ६ मिनिटे शिजू द्या. चांगले शिजल्यानंतर गॅस बंद करा
  • अशाप्रकारे तुमची ग्रेव्ही तयार होईल. यात वेगवगेळ्या भाज्या टाकून तुम्ही अनेक पदार्थ तयार करू शकता
[blurb content=””]

Web Title: How to make restaurant style thick and tasty gravy read recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2024 | 02:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.