केशर बदाम पॅक कसा तयार करावा
लग्न समारंभाच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी कोणत्याही कार्यक्रमच्या आधी महिला पार्लरमध्ये जाऊन फेशिअल किंवा इतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. या ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचेवर चमक येते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा काळवंडून जाते. वातावरणात सतत होणारे बदल, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींमुळे त्वचा खराब होऊन जाते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज दिसते. अशावेळी महिला केमिकल ट्रीटमेंट करतात. मात्र याचा फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल ट्रीटमेंटचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बदाम केशर फेसपॅक बनवण्याची कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
फेसपॅक तयार करताना भिजवलेल्या बदामाचा वापर करावा. यामध्ये विटामिन ई आणि त्वचेसाठी अतिशय पोषक घटक आढळून येतात. थंडीमध्ये कोरड्या पडलेल्या त्वचेसाठी बदाम वापराने अतिशय फायदेशीर आहे. यासाठी मिक्सरच्या भांड्यात ४ बदाम टाकून बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेली भांड्यात घेऊन त्यात अर्धा चमचा बेसन, चिमूटभर हळद टाकून मिक्स करा. पॅन गरम करून त्यावर टिश्यू पेपरमध्ये केशरच्या काड्या घेऊन गरम करून त्यांची पावडर तयार करा. तयार केलेली पावडर बेसनाच्या मिश्रणात टाकून मिक्स करा.
फेसपॅक तयार करताना त्यात कच्चे दूध घालून जाडसर मिश्रण तयार करा. जास्त दूध घातल्यास फेसपॅक पातळ होऊ शकतो. तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावून 25 मिनिटं ठेवा. त्यानंतर पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर असलेली टॅनिंग, डेडस्किन निघून जाईल आणि त्वचा सुंदर आणि चमकदार होईल. केशर बदामाचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर होईल. याशिवाय त्वचेवर सोन्यासारखी चमक येईल.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
उन्हामुळे त्वचेचा काळा पडलेला रंग पुन्हा उजळ्वण्यासाठी केशराचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये बदाम पावडर त्यात दोन ते तीन काड्या केशर टाकून तयार दूध मिक्स करून घ्या. केशर दुधात वितळल्यानंतर मिक्स करून घ्या. तयार फेसपॅक त्वचेवर लावून 10 मिनिटं ठेवा. यामुळे चेहऱ्यावर असलेले सर्व डाग निघून जाण्यास मदत होईल आणि त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसले.हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास त्वचेवर असलेले पिंपल्स लकीवा मुरुमांचे डाग निघून जाण्यास मदत होईल.