त्वचेला कायम तजेलदार दिसण्यासाठी काय खावे
वयाची ३० वर्षे ओलांडताच, त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. सुरकुत्या, बारीक रेषा आणि डाग यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या आहाराचाही तुमच्या त्वचेवर मोठा परिणाम होतो?
हो, असे काही खास पदार्थ आहेत जे तुमच्या त्वचेला आतून पोषण देऊन तरुण ठेवण्यास मदत करतात. या लेखात आपण त्या ५ सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊया जे ३० नंतरही तुमची त्वचा तरुण ठेवू शकतात. डाएटिशियन स्नेहा करमकरने याबाबत आपल्या वाचकांना अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
बदाम आणि अक्रोड
न चुकता बदाम आणि अक्रोड खावेत
बदाम आणि अक्रोड हे दोन्ही ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते जे त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. याशिवाय, त्यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. दररोज काही बदाम आणि अक्रोड खाऊन तुम्ही तुमची त्वचा निरोगी बनवू शकता.
प्रत्येक मुलीकडे असायलाच हवेत 5 Skin Care, त्वचा राहील कायम तरूण
पालक आणि हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या त्वचा चांगली राखण्यास मदत करतात
पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये अ, क आणि के जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे जीवनसत्त्वे त्वचेला कोलेजन तयार करण्यास मदत करतात ज्यामुळे त्वचा घट्ट आणि तरुण होते. याशिवाय, त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि ती तरुण ठेवतात. तुमच्या आहारात पालक, मेथी, सरसों का साग जी हिवाळ्यात अधिक प्रमाणात मिळते या भाज्यांचा समावेश करून तुम्ही तुमची त्वचा निरोगी ठेवू शकता
अॅव्होकॅडो
आहारात अवाकाडोचा समावेश करून घ्या
अॅव्होकॅडोमध्ये निरोगी चरबी, जीवनसत्त्वे ई आणि सी भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक घटक त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि तिला ओलावा देतात. याशिवाय, अॅव्होकॅडोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला जळजळीपासून वाचवतात आणि ती तरुण ठेवतात. तुम्ही अॅव्होकॅडो सॅलड, स्मूदी किंवा टोस्टमध्ये देखील खाऊ शकता.
Korean Glass Skin मिळवण्यासाठी 5 स्किन केअर टिप्स फॉलो करा, महागडे प्रोडक्टस खरेदी करण्याची गरज नाही
दही आणि प्रोबायोटिक्स
दह्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते
दही आणि प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेले इतर अन्नपदार्थ पचनक्रिया निरोगी ठेवतात तसेच त्वचा चमकदार बनवतात. हे चांगले बॅक्टेरिया त्वचेला संसर्गापासून वाचवतात आणि निरोगी ठेवतात. याशिवाय दह्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देखील असते जे हाडे मजबूत करते तसेच त्वचा निरोगी ठेवते. तुम्ही दररोज दही खाऊन किंवा प्रोबायोटिक्स सप्लिमेंट्स घेऊन हे करू शकता
बेरीज
नियमित नाश्त्यात बेरीज खाव्यात
बेरीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात जे तुमच्या त्वचेला आतून पोषण देतात. व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीस मदत करते ज्यामुळे तुमची त्वचा कसदार आणि मऊ – मुलायम होते. याशिवाय, अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला सूर्य आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. तुम्ही तुमच्या नाश्त्यात दह्यासोबत किंवा स्मूदीमध्ये मिसळून बेरी खाऊ शकता.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.