फोटो सौजन्य - Social Media
तुम्ही तुमच्या क्रशला तुमच्या भावना सांगण्यासाठी एक खास दिवस चालून आला आहे. या दिवशी तुमच्या भावनांना तुमच्या क्रशसमोर मांडा आणि गोड नात्याला सुरुवात करा. हो, आम्ही ‘व्हॅलेंटाईन डे’ विषयी म्हणत आहोत. फेब्रुवारी महिना लागला की प्रेम करणाऱ्यांना ओढ लागते ती या प्रेमाच्या दिवसाची. हा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी काही एखाद्या सणापेक्षा कमी नाही. या दिवशी दोन प्रेमींना एकमेकांसोबत दिवस घालवायला मिळतो. एकमेकांसोबत वेळ घालवता येतो.
आपल्या भावना एकमेकांना सांगता येतात, तसेच भविष्याविषयी चर्चा करत वर्तमानाला अतिशय गोड पद्धतीने जगता येते. जर तुम्ही कुणाच्या प्रेमात आहात तर कसला मुहूर्त पाहताय? Valentine Day पेक्षा चांगला मुहूर्त आणखीन कोणता? मग जास्त विचार नका करू. होईल ते होऊन जाऊदे. याच दिवशी तुम्ही तुमच्या क्रशला जाऊन प्रपोज करा आणि तुमच्या गोडसर नात्याला सुरुवात करा.
आपल्या भावना सांगताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणजे काही टिप्स हो! चला तर मग जाणून घेऊयात. तुमच्या क्रशला या दिवशी कुठेतरी डिनरला घेऊन जा. महत्वाची गोष्ट अशी की त्यासाठी तुम्हाला एकांत हवा. तर डिनरला तुम्ही आणि तुमची क्रश व्यतिरिक्त कुणीही सोबत नकोय. येथे तुम्ही तुमच्या भावना क्रशला सांगू शकता. मुळात, जर तुम्हाला त्या व्यक्तीच्या आवडी निवडी माहिती असतील. काम आणखीन सोपे होऊन जाईल. त्या व्यक्तीला अशा ठिकाणी घेऊन जा , जी त्या व्यक्तीची आवडती जागा असेल. तुमच्या क्रशला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडू नका. अशा ठिकाणी नेहून आपल्या भावना सांगणे खूपच फायद्याचे ठरू शकते. कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नवीन आणि महत्वाचे नात्याशी भेट होईल.
अशा ठिकाणी नेहून क्रशला प्रपोज करताना एक छानशी भेटवस्तू द्या. भेटीसोबत एक छानसे पत्र देऊन त्यावर आपल्या भावना शब्दात मांडा. हे क्षण आयुष्यातील फार खास क्षण असतात. आपला आयुष्यातील जोडीदार निवडण्याचे हे क्षण आपण डोळ्यात साठवतोच त्याचबरोबर त्या क्षणांना कुणाला तरी कॅमेरात टिपण्यासाठी सांगा. कदाचित ज्या व्यक्तीशी तुम्ही तुमच्या भावना शेअर करत आहात ती तुमच्या आयुष्याची साथीदार असू शकते. तर या स्पेशल व्यक्तीसाठी स्पेशल प्लॅन करणे तो बनता है ना बॉस!