फोटो सौजन्य - Social Media
‘Valentine Day’ अगदी जवळच आहे. प्रेम करणाऱ्यांच्या मनात चांदणे फुटण्यास सुरुवातही झाली असेल. अनेकांनी प्लॅनही तयार केले असतील. व्हॅलेन्टाईन डे जरी भारतीय सण नसला तरी भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुळात, हा सण प्रेमाचा दिवस मानला जातो. या दिवशी प्रियकर प्रियसी एकत्र वेळ घालवतात. काही एकमेकांना आपल्या भावना सांगतात तर काही एकमेकांना लग्नाची मागणी करतात. मुळात, हा दिवस नाते जोडणारा दिवस आहे असे म्हंटले तरी काही चुकीचे नाही. या दिवसात नाते बनतात, नाते फुलतात आणि प्रियकर प्रियसी आपल्या व्यस्थ जीवनातून नात्यासाठी काही विशेष लक्ष देतात. ‘Valentine Day’ म्हणजे नात्याला आणखीन भक्कम करणारा दिवस.
देशात या दिवशी अनेक प्रकरणे दिसून येतात कि काही संघटना जाऊन दोन प्रेम कर्त्यांमध्ये दुरावा तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना उगाच त्रास देतात. जर प्रियकर आणि प्रियसी बागेत शांत राहून आपल्या प्रेमाचा पिसारा फुलवत आहेत तर यात काही गैर नाही. चुकीचे तेव्हा असते जेव्हा सार्वजनिक जागेत अश्लीलपणा केला जातो. जर असे होत असेल तर पोलिसांनी यावर कारवाई करणे काही चुकीचे नाही. पण शांतपणे एकमेकांसोबत वेळ घालवणाऱ्या प्रेमींना त्रास देणाऱ्या संघटनांवर तसेच स्वतः पोलिसांवरही कायद्याने गुन्हा दाखल होऊ शकतो.
देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणीही कुणाला टोकू शकत नाही. जर एखादा कपल बागेत शांत पणे वेळ घालवत आहेत आणि तितक्यात कुणी त्यांना त्रास देऊन त्यांना हाकलून लावण्याच्या उद्देशाने आला असेल तर ते प्रेमी कायद्याचा वापर करत त्या त्रास देणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. कपल्स लोकांना त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकते. पोलीस जरी हाकलून लावण्याच्या प्रयत्न करत असतील तरी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवून त्यांची तक्रार करता येऊ शकते.
जर तुम्ही आपल्या प्रियसी किंवा प्रियकरासोबत ‘Valentine Day’ साजरा करण्यासाठी विचार करत आहात तर एखाद्या शांत जागेची निवड करा. जिथे खूप सारी लोकं आहेत अशा ठिकाणी जाणे कधीही उत्तम ठरेल. आपल्या प्रियसी सोबत कॅफेमध्ये जा किंवा सिनेमा पाहण्यास जा. तसेच छानशा हॉटेलमध्ये जाऊन डिनर करणेही उत्तम ठरेल.