Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताप आल्यानंतर लहान मुलांना स्पंजिंग कसे करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

हवामानात थोडा जरी बदल झाला तरीसुद्धा लहान मुलं लगेच आजारी पडतात. पण काहीवेळेस हा ताप औषध देऊनसुद्धा कमी होत नाही.तसेच त्यांच्या डोक्यावर मीठाच्या पाण्याच्या घड्या ठेवतात. यामुळे ताप हळूहळू कमी होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 27, 2024 | 05:47 PM
ताप आल्यानंतर लहान मुलांना स्पंजिंग कसे करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा इतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. लहान मुलं आजार पडल्यानंतर त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. खोकला, सर्दी किंवा ताप आल्यानंतर विषाणूजन्य संसर्गाला आपण सहज बळी पडतो. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलं आजारी पडल्यानंतर त्यांच्या आहारात आरोग्यासाठी पौष्टिक असलेले पदार्थ त्यांना खाण्यासाठी द्यावे.

हवामानात थोडा जरी बदल झाला तरीसुद्धा लहान मुलं लगेच आजारी पडतात. पण काहीवेळेस हा ताप औषध देऊनसुद्धा कमी होत नाही. अशावेळी अनेक पालक आपल्या मुलांना थंड पाण्याने पुसून काढतात. तसेच त्यांच्या डोक्यावर मीठाच्या पाण्याच्या घड्या ठेवतात. यामुळे ताप हळूहळू कमी होतो. पण अनेक पालकांना प्रश्न पडतो की लहान मुलांचे अंग ओल्या कापडाने पुसावे की नाही? त्यावर गुडविल चिल्ड्रन क्लिनिकचे बालरोगतज्ञ डॉ. सय्यद मुजाहिद हुसेन यांनी काही सल्ला दिला आहे. चला तर जाणून घेऊया डॉक्टरांनी दिलेला महत्वपूर्ण सल्ला.

ताप आल्यानंतर लहान मुलांना स्पंजिंग कसे करावे?

बालरोगतज्ञ डॉ.सय्यद मुजाहिद हुसेन यांच्या सांगण्यानुसार, लहान मुलांना ताप आल्यानंतर पॅरासिटामॉलसारखी औषधे देऊन २४ तासांच्या आतमध्ये ताप उतरला नाही, तर पालकांनी मुलांचे अंग ओल्या कापडाने पुसून काढावे. मुलांच्या मूत्रपिंड आणि यकृताचे औषधांमुळे होणारे नुकसान होण्यापासून संरक्षण लहान मुलांना ४ तासांच्या अंतराने औषध द्यावी. तसेच लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी बाळाचे तापमान 102 ते 104 असताना सुती कापडाने बाळाचे कपाळ, खांदे, मान आणि छाती हळूवारपणे पुसून काढा. यामुळे ताप कमी होईल.

[read_also content=”काळ्या द्राक्षांपासून घरी बनवून पाहा अंगूर बर्फी, सोपी रेसिपी https://www.navarashtra.com/lifestyle/try-homemade-grapes-barfi-made-from-black-grapes-539092.html”]

पण लहान मुलांना औषध दिल्यानंतर सुद्धा ताप येत असेल तर थंड पाण्याने स्पंजिंग करावे. जर स्पंजिंग करताना मुलं थरथर कापू लागले तर त्याला उबदार कपड्यात गुंडाळावे. यामुळे मुलांना थंडी वाजणार नाही. ताप आल्यानंतर लहान मुलं अशक्त होऊन जात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन वेळेत औषध उपचार करावे. ताप जास्त वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधांमध्ये बदल करावा.

मुलांना ताप आल्यानंतर मुलांची अशाप्रकारे काळजी घ्या:

  • लहान मुलांना भरपूर पाणी पिण्यासाठी द्यावे.
  • योग्य प्रकारे कपडे घाला. ज्यामुळे त्यांना थंडी वाजणार नाही.
  • मुलाला सूप, रस, कडधान्ये असे हलके अन्न द्यावे
  • मुलांना ८ तासांची शांत झोप द्यावी
  • मुलांना हर्बल चहा पिण्यासाठी द्यावा.

Web Title: How to sponge children after fever get expert advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2024 | 05:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.