पुरूषहो! कधीही पडणार नाही टक्कल, फक्त असा करा कांद्याचा वापर, रातोरात हेअरफॉल थांबून येतील नवे केस
आजकाल केसगळती ही एक सामान्य समस्या बनली आहे. केसगळतीची ही समस्या फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही हैराण करून सोडत आहे. सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरु आहे, या ऋतूत केसगळतीच्या समस्या दुपटीने वाढू लागतात. वय, हार्मोनल बदल, ताणतणाव आणि पर्यावरणीय घटक यामुळे ही समस्या आणखी वाढते. आपले केस हे आपल्या सौंदर्यात भर पाडत असतात, त्यामुळे यांची विशेष काळजी घ्यायला हवी. केसगळती थांबवण्यासाठी एक सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे कांद्याचा रस. कांद्याचा रसाचा नियमित वापर केल्याने केसगळती थांबते आणि केसांची वाढ सुधारते. यामुळे केस माजीबूत होऊन केसांना पोषण देखील मिळते. आज या लेखात आपण केसांसाठी कांद्याचा रसाचा कसा वापर करायचा ते जाणून घेणार आहोत.
खोबरेल तेल आणि कांद्याचा रस
खोबरेल तेल टाळूच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. यामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तुम्ही खोबरेल तेल कांद्याच्या रसात मिसळून टाळूवर मसाज करू शकता. यामुळे केसांची मूळ मजबूत होतील आणि केसगळती देखील बंद होईल. याच्या नियमित वापराने केसांची शाइन सुधारते आणि पांढरे केसही कमी होऊ लागतात.
थंडीत अंघोळ करताना अजिबात करू नका ही चूक, बाथरूममध्येच हार्ट अटॅक घेईल जीव, ब्रेन डेडचा वाढता धोका
मध आणि कांद्याचा रस
हिवाळ्यात केस रफ आणि रुक्ष होतात. यामुळे बहुतेक लोक या केमिकलयुक्त शॅम्पू आणि जेलचा वापर करतात. मात्र यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. केसांच्या या समस्येला दूर करण्यासाठी तुम्ही घरीच मध आणि कांद्याच्या रसाचे मिश्रण तयार करू शकता. मधामुळे टाळूला पोषण मिळते आणि केसांची वाढ सुधारते. यामुळे केस मऊ, चमकदार आणि चांगले वाढतात.
कोरफड आणि कांद्याचा रस
कोरफड हा केसांसाठी तसेच त्वचेसाठी एक रामबाण उपाय आहे. कोरफडीचा गर त्वचेला शांत करते आणि केसांची वाढ चांगल्या रीतीने वाढवते. कांद्याच्या रसात कोरफडीचा गर मिसळून टाळूला आणि केसांना लावल्यास केसगळती आणि कोंड्याची समस्या दूर होते. याच्या वापराने केस घनदाट, मुलायम आणि चमकदार बनतात.
कांद्याचा रस केसांना कसा लावावा?
कांद्याचा रस थेट केसांवर लावता येतो. यासाठी एक कांडा घ्या आणि याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाका. यानंतर याची एक बारीक पेस्ट तयार करून घ्या. ही तयार पेस्ट एका सुती कपड्यात टाकून चांगली पिळून घ्या. आता तयार कांद्याचा रस एका हवाबंद डब्यात भरून घ्या. आता हा रस हातांच्या साहाय्याने संपूर्ण केसांवर आणि टाळूवर लावा किंवा मसाज करा. काही तास हा रस केसांवर तसाच राहूद्या आणि मग शॅम्पूने केस धुवून टाका.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.