
फोटो सौजन्य - Social Media
चमकदार स्टेज, हजारों चाहत्यांची गर्दी आणि सुपरहिट गाण्यांची धमाल… पण मकाऊमध्ये आयोजित वॉटरबॉम्ब 2025 फेस्टिव्हलमधील कोरियन सिंगर ह्युनाचा परफॉर्मन्स एका धक्कादायक घटनेत बदलला. ९ नोव्हेंबरला “Bubble Pop” वर परफॉर्म करताना त्या अचानक स्टेजवर कोसळल्या. पाहता पाहता ही घटना केवळ मेडिकल इमर्जन्सी न राहता, K-pop इंडस्ट्रीतल्या अवास्तव सौंदर्यदाबाची गंभीर चेतावणी ठरली.
फॅन्सच्या मते, ह्युना गेल्या महिन्यात अत्यंत कठोर डाएटवर होत्या आणि त्यांनी तब्बल १० किलो वजन कमी केले होते. झपाट्याने वजन घटल्याने ऊर्जा कमी होणे, ब्लड शुगर असंतुलित होणे, मसल्स कमकुवत होणे यामुळे बेशुद्ध पडणे स्वाभाविक ठरू शकते. K-pop कलाकारांवर सदैव “स्लिम आणि परफेक्ट” दिसण्याचा दबाव असतो, आणि याच दडपणात अनेक कलाकार टोकाचे डाएट घेतात, ज्याचा गंभीर फटका त्यांच्या आरोग्यावर बसतो.
ह्युना यांना वसोवागल सिंकोप ही समस्या असून ताण, अपुरी झोप, पोषणकमी किंवा थकवा यामुळे ब्लड प्रेशर अचानक खाली जातं आणि व्यक्ती बेशुद्ध पडते. कठोर डाएट, तासन्तास रिहर्सल आणि स्टेजवरील मेहनत या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीराचा SOS सिग्नल! घटनेनंतर ह्युना यांनी फॅन्सची माफी मागितली आणि आता आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याचं आश्वासन दिलं.
ही घटना प्रत्येकाला शिकवण देते की वेगाने वजन कमी करणं, सोशल मीडियाच्या दबावात ‘परफेक्ट’ दिसण्याची धडपड करणं शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. आरोग्य हेच सर्वात महत्त्वाचं शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया नेहमी हळूहळू, संतुलित आणि सुरक्षित पद्धतीनेच करा.