
फोटो सौजन्य: iStock
Right Age to lose Virginity: आज आपण कितीही मॉडर्न झालो असलो तरी काही विषयांवर बोलणे टाळतोच. असाच एक विषय म्हणजे कौमार्य (Virginity). जेव्हा तरुण-तरुणी वयात येत असतात तेव्हा त्यांच्या शरीरात काही बदल होतात. हे बदल म्हणजेच वयात यायची पहिली पायरी. पुढे आपसूकच Virginity हा शब्द ओळखीचा होतो आणि मित्र मैत्रिणींमध्ये एक प्रश्न खाजगीत विचारला जातो, “तू व्हर्जिन आहेस का?’
आजच्या काळात अजून एक प्रश्न अनेकदा विचारला जातो. तो प्रश्न म्हणजे Virginity गमावण्याचे योग्य वय कोणते? यासाठी काही निश्चित मानक किंवा नियम आहे का? खरंतर हा विषय निश्चितच संवेदनशील आहे, परंतु आजच्या तरुणांमध्ये या प्रश्नाबाबत चर्चा होत आहे. चला या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणून घेऊयात.
पहिला प्रश्न असा आहे की, कौमार्य गमावण्यासाठी काही निश्चित वय असते का? याचे उत्तर अगदी सोपे आहे, नाही. यासाठी कोणतेही वय निश्चित नाही. वेगवेगळ्या समाज आणि धर्मांमध्ये याबद्दल वेगवेगळे नियम आहेत. अनेक ठिकाणी, लग्नानंतरच ते योग्य मानले जाते, तर आज समाजातील एका मोठ्या वर्गात, लग्नापूर्वी संमतीने शारीरिक संबंध ठेवणे सामान्य मानले जाते. लग्न होईपर्यंत वाट पाहावी की लग्नापूर्वी शरीर संबंध ठेवावे हे पूर्णपणे एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असते.
कौमार्य गमावण्याबद्दल काही कायदेशीर नियम आहे का? याचे उत्तर हो असे आहे. जगभरातील बहुतेक देशांमध्ये लैंगिक संबंधांसाठी संमतीचे कायदेशीर वय आहे, 18 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. याचा अर्थ असा की 18 वर्षापूर्वी कोणतेही लैंगिक संबंध गुन्हा मानले जातात. म्हणून, कौमार्य गमावण्याचे किमान कायदेशीर वय 18 वर्षे आहे.
कायदा आणि समाजाचा दृष्टिकोन समजल्यानंतर आता पाहूया की व्यक्ती कधी स्वतःला यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार समजते. साधारणपणे, किशोरावस्थेत प्रवेश केल्यानंतर आपल्या शरीरातील प्रजनन अवयव पूर्णपणे विकसित होऊ लागतात. मात्र त्या काळात आपण या गोष्टींसाठी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे तयार नसतो. मानसिक तयारीशिवाय संबंध ठेवण्यामुळे नंतर पश्चात्ताप, तणाव आणि मानसिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच कौमार्य गमावताना कोणत्याही प्रकारचा दबाव, उत्सुकता किंवा जबरदस्तीच्या प्रभावाखाली नव्हे तर समजुतीने आणि जबाबदारीने निर्णय घ्यावा.