(फोटो सौजन्य: istock)
आपल्या साैंदर्य हे फक्त चेहऱ्यामुळेच नाही तर सुंदर केसांंमुळेही खुलून येत असतं. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे केसांचे आरोग्य खराब होऊ लागते. केसांचे सतत गळणे, ड्रँड्रफ आणि फाटे फुटणे अशा अनेक समस्यांमुळे केस निर्जीव होऊ लागतात आणि हळूहळू केसांचे आरोग्य खराब होऊ लागते. बऱ्याचदा माहागडे प्रोडक्स वापरुनही केसांचे आरोग्य काही सुधारत नाही, अशात आज आम्ही तुम्हाला एक सोपा, घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वापराने तुम्ही घरीच तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी बनवू शकता.
थंडीमध्ये ओठ सतत फुटतात? मग बीटचा वापर करून घरीच बनवा नैसर्गिक लिपबाम, ओठांवर दिसून येईल जादू
आयुर्वेदात, ब्राह्मी हे केसांसाठी फायद्याचे असल्याचे मानले जाते. हा एक जुना आणि प्रभावी उपाय आहे जो केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतो आणि केसांच्या कूपांना स्वच्छ करुन केसांना न्यूट्रिशन देण्यास मदत करतो. ब्राह्मी तेल केसांना पोषण देते, त्यांना आतून मजबूत बनवते आणि दाट केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. याचा नियमित वापर तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यास तुमची मदत करेल. चला तर मग ब्राह्मी तेलाचे केसांना कोणकोणते फायदे होतात ते सविस्तर जाणून घेऊया.
केसाच्या वाढीस मदत
ब्राह्मी तेल केसांना पोषण मिळवून देते आणि त्यांना मजबूत करण्यास मदत करते. ब्राह्मी तेलाचा नियमित वापर केसांच्या मुळांना मजबूती मिळवून देण्यास आणि केसांना दाट बनवण्यास प्रभावी ठरतो. केसगळती होऊन टक्कल पडत असल्यास तुमच्या या समस्येलाही मुळापासून दूर करण्यास हे तेल फायदेशीर ठरते.
दाट केसांसाठी फायदेशीर
पातळ केस बऱ्याचदा तो लेन्थ देत नाहीत जो आपल्याला हवा असत. दाट केसांमुळे आपले केस आकर्षकही दिसू लागतात अशात केसांची वाढ जलद करण्यासाठी आणि केस दाट करण्यासाठी तुम्ही आपल्या केसांवर ब्राह्मी तेलाचा वापर करु शकता. ब्राह्मी तेल टाळूला थंड करण्यास आणि केसांना मजबूती मिळवून देण्यास मदत करते.
केसांचे फाटे करेल दूर
ब्राह्मी तेल फक्त केसांचे आरोग्यच सुधारत नाही तर केसांचे फाटेही दूर करते. याचा नियमित वापर कोरड्या आणि निर्जीव केसांना मॉइश्चरायझेशन करतो आणि त्यांचा पोत देखील सुधारतो.
केसांचा कोंडा दूर करतो
ब्राह्मी तेल केसांचा कोंडा दूर करतो. कोंडा बहुतेकदा बुरशीजन्य संसर्गामुळे होतो. अशात ब्राह्मी तेलाचा वापर कोंड्याचे प्रमाण कमी करते आणि टाळूली स्वच्छ देखील ठेवते. याचा वापर कोंड्याला प्रतिबंधित करु शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.