विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक आणि शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. विटामीन बी १२, विटामिन सी, विटामिन डी इत्यादी अनेक घटक शरीरासाठी महत्वाचे आहे. चुकीची जीवनशैली. खाण्यापिण्याच्या सवयी, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, कामाचा वाढलेला ताण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर होतो. त्यामुळे आहारात पौष्टिक घटकांचे सेवन करावे. मात्र शरीरात विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यास अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे आहारात विटामिन घ्यावी. रोजच्या आहारात विटामिन डी युक्त पदार्थांचा समावेश करावा.(फोटो सौजन्य – iStock)
प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये चिकन मटण खाण्याऐवजी नियमित करा ‘या’ भाकरीचे सेवन, स्नायूंमध्ये वाढेल ताकद
विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर अनेक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात. यासोबतच तुम्ही कोवळ्या उन्हात देखील उभे राहू शकता. त्यामुळे शरीरातील विटामिन डी ची कमतरता दूर होईल आणि शरीराला आराम मिळेल. विटामिन डी कमी झाल्यानंतर शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, काम करण्याची इच्छा न होणे, हाडं कमकुवत होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी या विटामिन डी युक्त पदार्थांचे सेवन करावे.
रोजच्या आहारात विटामिन डी चा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारते. याशिवाय हाडं मजबूत होतात. कमी झालेले विटामिन वाढवण्यासाठी नियमित 10 मिनिटं तरी सूर्यप्रकाशात बसावे, ज्यामुळे कमजोर झालेली हाडं सुधारतील. विटामिन डी च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. विटामिन डी वाढवण्यासाठी सूर्यप्रकाशात जाऊन उभे राहणे, विटामिन डी युक्त पदार्थांचे सेवन करणे, सप्लीमेंट्स घेणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात.
शरीराची कमी झालेले विटामिन डी वाढवण्यासाठी मशरूम खावेत. मशरूम खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. सूर्यप्रकाशामुळे मशरूममध्ये सूर्याचा अंश असतो. त्यामुळे शरीरात कमी झालेली विटामिन डी ची पातळी वाढवण्यासाठी नियमित मशरूम खावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात., मशरूम सूप, किंवा भाजी बनवून खाल्ली जाते.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं दैनंदिन आहारात अंड खाल्ले जाते. अंड खाल्यामुळे शरीराला कॅल्शियमसोबत विटामिन डी आढळून येते. अंड्यांमध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि विटामिन डी इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
विटामिन डी वाढवण्यासाठी नियमित आहारात डेयरी उत्पादनाचा समावेश करावा. यामध्ये तुम्ही दही, दूध, चीज इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. डेअरी प्रॉडक्टमध्ये दूधयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.