प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये चिकन मटण खाण्याऐवजी नियमित करा 'या' भाकरीचे सेवन
शरीरासाठी प्रोटीन अतिशय महत्वाचे आहे. यासाठी अनेक लोक आहारात फक्त चिकन, मटण आणि मासे इत्यादी ठराविक पदार्थांचे सेवन करतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी प्रोटीन अतिशय महत्वाचे आहे. शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यानंतर चिकन, मटण, डाळी इत्यादी ठराविक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र शाहाकारी लोक चिकन, मटण खाणे टाळतात. अशावेळी प्रोटीन वाढवण्यासाठी नेमकं काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
नजर अंधुक झाली आहे? सतत डोळे दुखतात? मग आठवड्यातून एकदा करा ‘या’ भाजीचे सेवन, नजर होईल तीक्ष्ण
प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात मक्याच्या भाकरीचे सेवन करावे. मक्याची भाकरी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. मक्याच्या दाण्यांचा वापर अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे रोजच्या आहारात गव्हाची चपाती खाण्याऐवजी मक्याची भाकरी खावी. मक्याची भाकरी खावी. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि इतर पौष्टिक घटक आढळून येतात.
तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी इत्यादी धान्यांपासून भाकरी बनवली जाते. मात्र आठवड्यातील काही दिवस मक्याच्या भाकरीचे सेवन करावे. मक्याची भाकरी खाल्यामुळे पोटही भरते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते, शरीरातील स्नायू मजबूत राहतात, लठ्ठपणा नियंत्रणात राहतो याशिवाय इतरही अनेक फायदे होतात. तसेच आहारात फायबरयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करावे.
गहू, तांदूळ आणि इतर भाकरीप्रमाणे मक्याची भाकरी बनवली जाते. मक्याची भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात पीठ घेऊन त्यात गरम पाणी घालून मळून घ्या. त्यानंतर मक्याच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून लाटा. त्यानंतर तयार केलेली भाकरी तव्यावर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा. या पद्धतीने तुम्ही मक्याची भाकरी बनवू शकता. मक्याची भाकरी तुम्ही पालक आणि इतर कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता. यामुळे वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहील.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, चवीसोबत आरोग्याला होतील अनेक फायदे
शरीरात वाढलेली अतिरिक्त साखर आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. जास्त साखर खाल्यामुळे मधुमेह होतो. त्यामुळे रोजच्या आहारात कमी साखरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात मक्याची भाकरी खावी. या भाकरीमुळे शरीराला अनेक फायदे देखील होतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी मक्याची भाकरी प्रभावी आहे.