फोटो सौजन्य - Social Media
थंडीचा महिना सुरु झाला आहे. बदलत्या ऋतूसह लोकांनी सवयींमध्येही बदल केला पाहिजे. याने आरोग्यावर परिणाम होत नाही. तर अशा काही गोष्टी आहेत, ज्यांचे निदान हिवाळ्यात तरी सेवन कमी करावे. दही पोषणमूल्यांनी समृद्ध आहे. दही खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात. परंतु, थंडीच्या महिन्यामध्ये दही खाणे कितपत योग्य असते? चला तर मग जाणून घेऊयात.
दही खाण्याचे अनेक फायदे असतात. दही हे प्रोबायोटिक्सने समृद्ध आहे. पचनशक्ती सुधारण्यासाठी दही फायद्याची आहे. मुळात, थंडीमध्ये आपल्या शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. दही खाल्ल्याने गॅस आणि अपचनसारख्या समस्या कमी होतात. दह्यामध्ये फार जास्त प्रमाणात प्रथिने असतात. थंड वातावरणात शरीराला गरम ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करणे फार महत्वाचे असते. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतो. याचे प्रमाणही फार असते. लॅक्टिक ऍसिड शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवते. लॅक्टिक ऍसिडमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्वचेची आणि केसांची निगा राखा. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडत जाते. दहीतील पोषणमूल्ये त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मुदत करतात. त्वचेला हायड्रेट करण्यासाठी थंडीत दही खाणे फार फायद्याचे ठरते.
थंडीमध्ये दही खाण्याचे काही नुकसानही असतात. जर सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होत असेल. तर दही खाणे टाळा. ऋतू कोणताही असो सर्दी खोकल्याचा त्रास असल्यास दहीपासून लांब राहणेच उत्तम असते. अशा वेळेमध्ये दही खाल्ल्याने सर्दी आणि कफ वाढण्याची शक्यता असते. दही थंड असल्यामुळे गळ्यात खवखव वाढू शकते. त्रास वाढू शकतो. अशा परिस्थितीमध्ये गरम तूप किंवा मधासोबत दही खाणे योग्य ठरते. जर तुम्हाला दही खाण्याची आवड असेल किंवा दही खाण्याची सवय असेल तर काही बाबी आहेत, ज्या निदान हिवाळ्यात तरी लक्षात ठेवाव्यात. दह्याचे सेवन नेहमी दिवसा करावे. रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे. दही थेट खाणे टाळा. त्यामध्ये मध किंवा साखर घोळून खा. थंडीत कोमट दुधातून तयार झालेले ताजे दही खाणे योग्य आहे.
थंडीत दही खाणे पूर्णपणे अयोग्य नाही, परंतु आपल्या प्रकृतीनुसार आणि योग्य वेळेत ते खाल्ले तरच फायदेशीर ठरते. आपली प्रकृती पहा. वेळ आणि काळ पहा. या सर्व बाबींचा अभ्यास करून दैनंदिन आहारात त्याचा समतोल समावेश केला तर त्याचे पोषणमूल्य शरीरासाठी उपयोगी पडते.