Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलोंजीच्या बियांचे आहेत जबरदस्त फायदे, कोण कोणत्या गोष्टीत वापरता येईल? जाणून घ्या

कलोंजीच्या बिया खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात. या बिया अनेक प्रकारे आणि अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाऊ शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2024 | 01:25 PM
कलोंजीच्या बियांचे आहेत जबरदस्त फायदे, कोण कोणत्या गोष्टीत वापरता येईल? जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

कलोंजीच्या बियांना इंग्रजीमध्ये ब्लॅक सीड्स (Black Seeds) अथवा नायजेला सीड्स (Nigella Seeds) असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कलोंजीच्या बियांना, एक मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळ्खले जाते. भारतात सुकलेल्या कलौंजीच्या बिया भाजून त्याचा वेगवगेळ्या प्रकारे वापर केला जातो. समोसा, पापडी, कचोरीसारख्या अनेक खुशखुशीत पदार्थांमध्ये या कलोंजीच्या बियांचा वापर केला जातो. कलोंजीच्या बियांचा आपल्या आहारात समावेश समावेश करणे नक्कीच फायदेकारक ठरू शकते. या बियांमध्ये अनेक पोषकतत्वे आढळली जातात. या बियांचा फायदा आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठीही होऊ शकतो.

अशा प्रकारे करा कलोंजीच्या बियांचा वापर
आपल्या भारतीय मसाल्याची खासियतच ही आहे की, यांना कोणत्याही खाद्यपदार्थात वापरल्यास त्या खाद्यपदार्थाचा स्वाद द्विगुणित होतो. हे मसाले फक्त खाद्यपदार्थाचा स्वादच नाही वाढवत तर, हे आरोग्यासाठीही तितकेच पौष्टिक मानले जातात. कलोंजीबद्दल बोलायचे झाले तर, यांना एखाद्या खाद्यपदार्थामध्ये टाकल्याने फक्त त्या खाद्यपदार्थाचा स्वादचं नाही बदलत तर तो खाद्यपदार्थ दिसायलाही आकर्षक वाटतो. तुम्ही या बियांची पावडर बनवूनही याचा वापर करू शकता अथवा पाण्यात भिजवूनही हे वापरले जाऊ शकते.

[read_also content=”जंजिरा किल्ला पाहण्याचा प्लॅन करत असाल तर थांबा! ‘या’ तारखेपासून किल्ला राहणार बंद https://www.navarashtra.com/maharashtra/murud-janjira-fort-in-raigad-will-be-closed-during-monsoon-due-to-the-water-barrier-maharashtra-tourism-nrpm-536051.html”]

कलोंजी बिया वापरण्याचे प्रकार

1. कलोंजीच्या बियांची पावडर तयार करून, एका ऐअरटाईट डब्यामध्ये याला साठवून ठेवा. ब्रेडवर नंतर बटर लावून त्यावर ही कलोंजी पावडर छिडकता येऊ शकते.

2. पनीरच्या स्लाइसेसना मॅरीनेट करून थोडं रोस्ट केल्यानंतर यावर ही पावडर छिडकल्याने, हे फक्त दिसायलाच नाही तर खायलाही अप्रतिम लागते.

3. अचारी दहीच्या तडक्यामध्ये कलोंजी बिया टाकल्याने याची चव द्विगुणित होते. याचप्रकारे तुम्ही तंदुरी रोटी, मठरी, ब्रेड अशा गोष्टींवरही याचे दाणे लावू शकता. असे केल्याने हे दिसायला अधिक चांगले आणि आकर्षित वाटेल.

4. भरलेली भेंडी, कार्ली अशा भाज्यांमध्ये लागणाऱ्या ,मसाल्यामध्येही तुम्ही याचा वापर करू शकता. अन्य मसाल्यांसोबत कलोंजीच्या बियांची पावडर भाजीत टाकल्याने याचा स्वाद कामालंच लागतो.

5. सलाड बनवतानाही त्यावरील ड्रेसिंगसाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये मीठ, काळी मिर्चीची पेस्ट आणि थोडीशी कलोंजी पावडर मिक्स करून टाका. याने सलाडचा स्वाद नक्कीच वाढेल.

6. आंब्याचं लोणचं किंवा चटणी बनवताना, कलोंजीचा वापर करा. एवढेच नाही तर भातात जिऱ्याचा तडका देतातानाही तुम्ही या कलोंजीच्या बियांचा वापर करू शकता. यासाठी जिऱ्यासोबतच या बियांनाही तडका द्या आणि हा तडक भातात टाकून द्या.

कलोंजीच्या बियांचे फायदे

  • आहारात कलोंजीच्या बियांचा समावेश करणे फायद्याचे ठरू शकते. ज्यांना मधुमेहिची समस्या आहे, अशांना कलोंजीच्या बिया फायद्याच्या ठरू शकतात.
  • कलौंजीमुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. आजच्या धावपळीच्या युगात अनेकांना डोकेदुखीच्या समस्या होत असते. या समस्येवरही मात करण्यासाठी कलोंजीच्या बिया उपयुक्त ठरतात. यासाठी कलोंजीच तेल थोड्यावेळ डोक्यावर लावून मसाज करा, काही मिनिटांमध्येच तुम्हाला यांचा फरक जाणवेल.
  • तुम्ही वजन कमी करण्यासाठी जर कोमट पाणी, मध आणि लिंबू पित असाल तर आता त्यामध्ये चिमूटभर कलौंजीच्या बियाही टाकण्यास सुरूवात करा. कारण याचा तुमच्या वजन कमी करण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Kalonji seeds have tremendous benefits how can use them find out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2024 | 01:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.